ACP Vijay Chaudhary | ACP आणि ट्रीपल महाराष्ट्र केसरी ठरलेले पै. विजय चौधरी गणरायासमोर ‘बेभान’ होतात तेव्हा… (व्हिडीओ)

ACP Vijay Chaudhary | acp and triple maharashtra kesari vijay chaudhary ganapati bappa dance see amazing video.

पुणे :बहुजननामा ऑनलाईन –  ACP Vijay Chaudhary | कोरोना संकटाचे मळभ दूर करून सर्वत्र उत्साहात गणपती बाप्पाचं घरा घरात आगमन झाले आहे. सगळीकडे एक वेगळीच धूम पाहायला मिळत आहे. नेहमीच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना २४ तास ऑन ड्युटी राहावे लागते त्यामुळे त्यांना कोणतेही सण उत्सव साजरे करता येत नाही. गणपती काळात सुरक्षेच्या व्यस्त कामातून थोडा वेळ काढत गणरायाच्या आगमनावेळी नाद निनादला गाण्यावर पुण्यातील एसीपीनी (ACP Vijay Chaudhary) ठेका धरला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

बारा ते पंधरा तास न थकता ड्यूटी करणारे पोलिसही आपल्या घरी गणरायाचे उत्साहात स्वागत करत असतात. पण बंदोबस्तामुळे त्यांना गणेशोत्सवाचा आनंद लूटता येत नाही.
आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत पुणे शहर दलातील एसीपी आणि ट्रीपल महाराष्ट्र केसरी ठरलेले पैलवान विजय चौधरी यांनीही आपल्या घरी गणरायाची स्थापना केली आहे.
यावेळी त्यांनी गणराया समोर नाद निनादला या गाण्यावर ठेका धरला.
बाप्पाच्या समोर नाचण्याचा मोह त्यांना सुद्धा आवरता आला नाही.
त्यांनी जबरदस्त डान्स परफॉर्म केला. अगदी साजेसं असं गणपती डान्स करून त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आपल्या अफलातून नृत्यकौशल्यानं ते सर्वांचीच मनं जिंकत आहेत. राज्यावरील कोरोना विघ्न दूर करण्यासाठीचं साकडं देखील त्यांनी त्यांनी गणरायाला घातल.
विजय चौधरी यांचा डान्स इतका जबरदस्त झाला की, हा डान्स पाहून भले भले डान्सर आणि कलाकारांचा डान्सही फिका ठरत आहे.
गाण्यातील ठेक्यावर त्यांचे थिरकणारे पाय.
चेहऱ्यावरील हावभाव पाहिले की व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावरही स्मित हास्य आल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावरील हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.
खाकी वर्दीतील गणेश भक्ताच्या अंदाजाच नेटकरी मंडळी भरभरून कौतुक करत आहेत.

 

Web Title : ACP Vijay Chaudhary | acp and triple maharashtra kesari vijay chaudhary ganapati bappa dance see amazing video.

 

Hasan Mushrif | किरीट सोमय्यांच्या गंभीर आरोपानंतर हसन मुश्रीफांचा पलटवार, करणार 100 कोटीचा दावा

Pune MNS | ‘बलात्कार करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंगा करु’, मनसेच्या रूपाली पाटील आक्रमक (व्हिडिओ)

Pune Crime | आकाश भापकर टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई; आतापर्यंत 54 गँगवर MCOCA अ‍ॅक्शन

Pune Corporation | पुण्यातील अनधिकृत ‘होर्डींग्ज’वर होणार कारवाई, दंड वसुली आणि होर्डींग्जचे नियमितीकरणासाठी स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती करणार – मनपा आयुक्त विक्रम कुमार