• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pimpri News : बनावट ओळखपत्राद्वारे फसवणूक करणारा तोतया सहाय्यक पोलीस आयुक्त ताब्यात

by Namrata Sandhbhor
March 3, 2021
in क्राईम, पिंपरी-चिंचवड
0
Nigdi-Transport-Branch

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून हुल देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला निगडी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन चिखली पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई मंगळवारी (दि.2) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जाधव सरकार चौक कुदळवाडी येथे करण्यात आली.

प्रविण लक्ष्मण सुर्यवंशी (वय-33 रा. मल्हारपेठ, ता. कराड, जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या तोतया पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाहतुक पोलीस सुनिल शिवाजी गायकवाड (वय-40) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी वाहतूक शाखेचे पोलीस कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत होते. मंगळवारी सायंकाळी होंडा झॅज कार (एमएच 50 एल 2216) मधून आरोपी प्रवीण सुर्यवंशी आला. तो स्वत: अंधेरी वेस्ट, मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. तसेच त्याने बनावट ओळखपत्र दाखवले. ओळखपत्रावर असलेल्या फोटोमध्ये फोटोतील व्यक्तीच्या खांद्यावर राजमुद्रा व स्टार असल्याचे दिसत असल्याने ओळखपत्र बनावट असल्याची शंका पोलिसांना आली. त्याला कुदळवाडी चौकीत आणून सखोल चौकशी केली असता त्याने आपण पोलीस अधिकारी नसल्याची कबुली दिली. तसेच ओळखपत्र टोल नाक्यावर दाखवून त्याने शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत समोर आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त सुधिर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एस. राऊत, पोलीस नाईक गायकवाड, दहिफळे, कशाळे, कोल्हे यांच्या पथकाने केली.

Tags: acpCommissioner of Police Krishna PrakashFake identity cardNigdi Traffic Branch PolicepimpriSub-Inspector of Police S.S. Rautनिगडी वाहतूक शाखेचे पोलीसपिंपरीपोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशपोलीस उपनिरीक्षक एस.एस. राऊतबनावट ओळखपत्रसहाय्यक पोलीस आयुक्त
Previous Post

फडणवीसांचा विधानसभा अध्यक्षांना मिश्किल सवाल, म्हणाले- FASTag गाड्यांना लावायचा की आमदारांना

Next Post

सेलिब्रिंटींच्या घरावरील छापेमारीवर CM ठाकरे म्हणाले, ‘मोदी सरकारविरोधात बोलल्याचा परिणाम’

Next Post
Anurag-Tapsi

सेलिब्रिंटींच्या घरावरील छापेमारीवर CM ठाकरे म्हणाले, 'मोदी सरकारविरोधात बोलल्याचा परिणाम'

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Nigdi-Transport-Branch
क्राईम

Pimpri News : बनावट ओळखपत्राद्वारे फसवणूक करणारा तोतया सहाय्यक पोलीस आयुक्त ताब्यात

March 3, 2021
0

...

Read more

त्रास दिल्यामुळेच गर्भपात, शिवकुमारवर आणखी 3 गुन्हे दाखल

6 days ago

केंद्रीय कर्मचार्‍यांना लवकरच मिळणार वाढीव DA ! खात्यात येणार थकबाकीची रक्कम?

4 days ago

नोकरी टिकवण्यासाठी 2 कोटी अनिल देशमुखांनी मागितले होते – सचिन वाझे

5 days ago

राज्यात 3 आठवड्यांचा कडक Lockdown ?, विजय वडेट्टीवरांचं मोठं विधान

3 days ago

पेंशन फंड मॅनेजर्सच्या फीमध्ये वाढ; जाणून घ्या PFMs आणि ग्राहकांना ‘कसा’ होईल फायदा

6 days ago

सोन्याचा भाव जैसे थे तर चांदी चकाकली, जाणून घ्या आजचा दर

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat