ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून

August 21, 2024

धुळे : ACB Trap On Female Education Officer | शासनाने थकीत वेतन व भविष्य निर्वाह निधीची रक्कम दिली असतानाही ती देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेताना शिक्षणाधिकारी अधीक्षका यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. (Dhule Bribe Case)

मिनाक्षी भाऊराव गिरी Meenakshi Bhaurao Giri (अधीक्षका, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद धुळे तथा अधीक्षका (माध्यमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय धुळे) असे अटक केलेल्यांचे नाव आहे. (Dhule ACB Trap Case)

तक्रारदार व त्यांची पत्नी धुळे येथील महानगर पालिका हायस्कुलमध्ये विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ३० नोव्हबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये त्यांचे एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील थकीत वेतन तसेच ७ व्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मंजूर केला. शिक्षण संचालक पुणे यांनी हे थकीत वेतन अधीक्षक (माध्यमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, धुळे यांच्या खात्यात जमा केले होते. परंतु, हे थकीत वेतन तक्रारदार व त्यांच्या पत्नीस अदा न झाल्याने त्यांनी वेळोवेळी मिनाक्षी गिरी यांची भेट घेतली होती. तरी वेतन देण्यात आले नाही. १५ ते २० दिवसांपूर्वी तक्रारदार यांनी गिरी यांची भेट घेऊन थकीत वेतन देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी तक्रारदार यांच्याकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयात येऊन तक्रार केली.

या तक्रारीची मंगळवारी पडताळणी केली. तेव्हा गिरी यांनी २ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या कार्यालयात सापळा लावला. तक्रारदार यांच्याकडून २ लाख रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे, व जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.