ACB Trap News | 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला मंडल अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – वारस नोंदणीसाठी (Heir Registration) दाखल तक्रारी अर्जावर सुनावणी घेऊन निकाल बाजूने देण्यासाठी 20 हजारांची लाच स्वीकारताना (Accepting Bribe) करमाळा तहसील कार्यालयातील (Karmala Tehsil Office) महिला मंडल अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या (ACB Trap News) सापळ्यात अडकल्या. शाहिदा युनुस काझी Shahida Younus Kazi (वय-42) असे मंडल अधिकाऱ्याचे (Mandal Officer) नाव आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.30) जेऊर शहरातील मंडल अधिकारी कार्यालय येथे करण्यात आली.
याबाबत तक्रारदार यांनी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Solapur ACB Trap News) तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी वारस नोंदीसाठी कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सुनावणी घेऊन तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी शाहिदा काझी यांनी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत सोलापूर एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि.29) पडताळणी केली असता, काझी यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजारांची
लाच मागून तडजोडीअंती 20 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
मंगळवारी जेऊर येथील मंडल कार्यालय परिसरात सापळा लावण्यात आला.
यावेळी तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना शाहिदा काझी यांना रंगेहाथ
पकडण्यात (ACB Trap News) आले. काझी यांच्या विरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध
कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक शितल जानवे
(Addl SP Shital Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार (DySP Ganesh Kumhar),
पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक (PI Umakant Mahadik), पोलीस अंमलदार स्वामीराव जाधव, अतुल घाडगे,
सलिम मुल्ला, शाम सुरवसे यांच्या पथकाने केली.
Web Title : ACB Trap News mahila mandal officials caught in the acb trap while accepting a bribe of 20000 for heir registration
- Pune Crime News | वानवडी पोलीस स्टेशन : बी.टी. कवडे रोडवर सिनेकलाकरांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक, 74 हजारांचा मुद्देमाल जप्त
- Chhatrapati Sambhajinagar Police Inspector / ACP Transfers | छत्रपती संभाजीनगर पोलिस दलातील 10 पोलिस निरीक्षक, 5 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या, नियुक्त्या
- Aundh Road-Khadki Railway Junction | खडकी रेल्वे स्टेशन जंक्शन येथील अतिक्रमणाबाबत संयुक्तपणे कारवाई करा – जिल्हाधिकारी
Comments are closed.