• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

ACB Maharashtra | कोरोनाच्या दुसर्‍या वर्षात ‘लाचखोरी’ची लागण ! महसुल अग्रस्थानी मात्र ‘वसुली’त पोलिसांची आघाडी, ‘कॉन्स्टब्लेरी’च जाळ्यात अडकण्याचे प्रमाण अधिक

by Sikandar Shaikh
September 11, 2021
in आरोग्य, क्राईम, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
ACB Maharashtra | Corona's second year of 'bribery'! At the forefront of revenue, however, the police lead in 'recovery', while 'constablary' is more likely to be caught

file photo

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – ACB Maharashtra | कोरोनामुळे व्यवहार ठप्प झालेल्या २०२० या वर्षापेक्षा यंदाच्यावर्षी लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये पहिल्या आठ महिन्यांत नेहमीप्रमाणे पहिले आणि पोलिस दलाने दुसरे स्थान कायम राखले आहे. मात्र, लाचखोरीमध्ये पोलिस दल हे दुसर्‍या क्रमांकावर राहीले असले तरी लाचखोरीत (ACB Maharashtra) पकडलेली रक्कम ही महसुल विभागापेक्षा अधिक असल्याने पोलिस दलातील ‘चिरीमिरीचा’ रेट हा अन्य कोणत्याही विभागापेक्षा ‘हाय’ असल्याचे दिसून येत आहे. त्यातही वर्ग एक आणि दोनच्या अधिकार्‍यांपेक्षा वर्ग तीन अर्थात ‘कॉन्स्टेबलरी’ च या सापळ्यात अधिक अडकत असल्याचे निदर्शनास येत आहे.

मुंबईचे सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांनी दरमहा शंभर कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचे विधान करून खळबळ उडवून दिल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एवढेच नव्हे तर त्यांच्यामागे सीबीआय, ईडी आणि एनआयए या केंद्रीय तपासयंत्रणांचा ससेमिराही लागल्याचे उदाहरण ताजे आहे. यावर्षी मार्चमध्ये घडलेल्या या घटनेचे पडसाद आजही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात उमटत आहे. पोलिस आणि चिरिमिरी हे तसे नवीन समिकरण नसले तरी या घटनेमुळे संपुर्ण राज्य पोलिस दल हादरून गेले आहे. मात्र, यानंतरही ‘चिरिमिरीच्या’ गोरख धंद्याला अटकाव लागू शकलेला नाही, हेच वास्तव राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात अँन्टी करप्शनने या वर्षी पहिल्या आठ महिन्यांत केलेल्या कारवायांमधून दिसून येत आहे.

मागील संपुर्ण वर्ष कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनमध्ये गेले. लॉकडाउनमध्ये आरोग्य यंत्रणेसोबत महसुल व पोलिस यंत्रणेने चांगले काम केले, यामध्ये दुमत नाही. परंतू नियमित कामामध्ये अद्यापही सुधारणा होत नसल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे. यावर्षी जानेवारी ते ऑगस्टमध्ये अँन्टी करप्शनने ५३२ गुन्हे दाखल केले असून ७४७ शासकिय सेवकांना अटक केली आहे. यामध्ये महसुल विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांवर सर्वाधीक अर्थात १३३ गुन्हे नोंदविले गेले आहेत. यासाठी लावलेल्या सापळ्यांत १९३ जणांना अटक केली असून लाचेची रक्कम ३१ लाख ७६ हजार ७०० रुपये सापडली आहे. त्याचवेळी याच कालावधीत पोलिस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांवर लाचप्रकरणी १०८ गुन्हे दाखल झाले असून १६२ अधिकारी, कर्मचार्‍यांना अटक केली आहे. यामध्ये ३७ लाख ५ हजार १०० इतकी लाचेची रक्कम सापडली आहे.

लाच प्रकरणी महसुल विभागातील प्रथम श्रेणीतील १४ अधिकारी, द्वीतीय श्रेणीतील ४,
वर्ग तीनचे १११ सेवक आढळून आले आहेत. तर या व्यवहारात ‘तोडगा’ करणार्‍या ३९ एजंटांचाही समावेश आहे. त्याचवेळी महसुलपेक्षा २५ गुन्हे कमी असलेल्या पोलिस दलातील प्रथम श्रेणीतील ७ आणि द्वितीय श्रेणीतील ८ तर वर्ग तीनचे तब्बल १२३ कर्मचार्‍यांना लाचखोरीत अटक करण्यात आली आहे. तर लाचखोरीत ‘मध्यस्थी’ करणार्‍या १७ खाजगी एजंटांचाही समावेश दिसून आला आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

राज्यामध्ये प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या कमी अधिक आहे.
यामध्ये महसुल विभागात सर्वाधिक अधिकारी व कर्मचारी आहेत, त्यापाठोपाठ पोलिस दलाचा क्रमांक लागतो. त्यामुळे महसुल विभागातील लाचखोरीची सर्वाधिक प्रकरणे समोर येत असली तरी लाच घेताना पकडले गेल्यांमध्ये पोलिस दलातील वर्ग ३ च्या कर्मचार्‍यांचा अर्थात ‘कॉन्स्टब्लरी’ची संख्या अधिक आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदानुसार प्रत्यक्षात रस्त्यावर जनतेच्या पहिल्यांदा संपर्कामध्ये येणार्‍या
समस्त पोलिस कर्मचार्‍यांसाठी ही मान खाली घालायला लावणारी बाब असल्याचेच अँन्टी करप्शन विभागाच्या कारवाईचे विश्‍लेषण केल्यास दिसून येते.

१ जानेवारी ते ८ सप्टेंबर २०२१ पर्यंतचा ‘लाचखोरीचा’ लेखाजोखा
५३२ गुन्हे दाखल – ५६ प्रथम श्रेणीतील अधिकारी -७६ द्वितीय श्रेणीतील अधिकारी – ४०६ वर्ग तीनचे कर्मचारी – ७४७ एकूण अटक – लाचखोरीत सापडले १ कोटी ५१ लाख ४३ हजार ७०० रुपये. (लाचखोरीमध्ये ७४७ लोकसेवकांना अटक केली असून त्यांना १ कोटी ५१ लाख ४३ हजार ७०० रुपये घेताना अटक केली आहे. याचाच अर्थ सरासरी २० हजार २७२ रुपयांसाठी एकाला अटक करण्यात आली असून नोकरी गमावण्याची वेळ आली आहे).

Web Titel :- ACB Maharashtra | Corona’s second year of ‘bribery’! At the forefront of revenue, however, the police lead in ‘recovery’, while ‘constablary’ is more likely to be caught

Pune Corporation | चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या कामात ‘टर्मिनेट’ केलेल्या कंपनीची ‘जायका’ नदीसुधारसाठी निविदा; ‘जॉंईट व्हेंचर’मध्ये मदत केल्याने अडचणीत !

Gold Price Update | सोन्याच्या दरातील घसरणीमुळे खरेदीदारांची ‘चांदी’, जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीन दर

Pune Cyber Crime | धनंजय मुंडे, करुणा शर्मांचे फोटो टाकून FB वर बदनामीकारक ‘पोस्ट’ ! शरद पवार, फडणवीस, संजय राऊत यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांबद्दल अश्लिल ‘मजकूर’; पुण्यात गुन्हा दाखल

Anna Hazare | अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा; पुन्हा बसणार उपोषणाला

Tags: ACB MaharashtraAnil DeshmukhbreakingcbiCentral Investigation AgencyConstabularyCoronaDepartment of Revenueedlatest marathi newsMumbai Assistant Inspector Sachin WazeNIAPolice forceईडीएनआयएकोरोनापोलिस दलमहसुल विभागलाचलुचपत प्रतिबंधक विभागसद्रक्षणाय खलनिग्रहणायसीबीआय
Previous Post

Pune Corporation | चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या कामात ‘टर्मिनेट’ केलेल्या कंपनीची ‘जायका’ नदीसुधारसाठी निविदा; ‘जॉंईट व्हेंचर’मध्ये मदत केल्याने अडचणीत !

Next Post

EPFO Alert | पीएफ खातेधारकांनी व्हावे सावध! ‘या’ गोष्टीकडे दिले नाही लक्ष तर गमवावी लागेल सर्व रक्कम

Next Post
EPFO | epfo pf account holder should be careful.

EPFO Alert | पीएफ खातेधारकांनी व्हावे सावध! 'या' गोष्टीकडे दिले नाही लक्ष तर गमवावी लागेल सर्व रक्कम

Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; The Neutralias team won
क्रिडा

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस संघाला विजेतेपद

May 18, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Punit Balan Group Women's Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन...

Read more
Petrol Diesel Prices Today | petrol diesel prices today 18 may 2022 know latest rate

Petrol Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

May 18, 2022
Constipation Cure Tips | constipation cure tips for healthy stomach acidity gas and digestion problem stay away

Constipation Cure Tips | बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी ‘या’ 4 गोष्टी आहारात समाविष्ट करा; जाणून घ्या

May 16, 2022
fatty liver disease symptoms causes treatment prevention non alcoholic fatty liver disease

Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरचा धोका ‘या’ लोकांना जास्त, फॅट वाढल्यास व्हा सावध; जाणून घ्या

May 16, 2022
High Cholesterol | high cholesterol warning signs in your body legs feet nails which lead to heart attack stroke

High Cholesterol | पायांवर दिसत असतील हाय कोलेस्ट्रॉलचे ‘हे’ संकेत तर दुर्लक्ष करण्याची कधीही करू नका चूक; जाणून घ्या

May 16, 2022
Cholesterol Control | yoga asanas benefits for cholesterol control in marathi high cholesterol effects on body

Cholesterol Control | योगासनाच्या मदतीनं कोलेस्ट्रॉल कमी होतो? जाणून घ्या कोणतं आसान राहिल लाभदायक

May 16, 2022
30 Plus Skin Care | fashion beauty 30 plus skin care routine want to look young and beautiful even in growing age so follow these tips

30 Plus Skin Care | वाढत्या वयातही तुम्हाला नवीन आणि सुंदर दिसायचं असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स; जाणून घ्या

May 16, 2022
Fruits For Heart Attack | fruits for heart attack eat strawberries blueberries blackberries and raspberries

Fruits For Heart Attack | हार्टच्या आजारापासून करायचा असेल बचाव तर आजच डाएटमध्ये समावेश करा ‘या’ फळांचा; जाणून घ्या

May 16, 2022
Benefits Of Peach | peaches are not just good for digestion but also seasonal allergies know amazing benefits

Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत आजार होतील दूर; जाणून घ्या

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ACB Maharashtra | Corona's second year of 'bribery'! At the forefront of revenue, however, the police lead in 'recovery', while 'constablary' is more likely to be caught
आरोग्य

ACB Maharashtra | कोरोनाच्या दुसर्‍या वर्षात ‘लाचखोरी’ची लागण ! महसुल अग्रस्थानी मात्र ‘वसुली’त पोलिसांची आघाडी, ‘कॉन्स्टब्लेरी’च जाळ्यात अडकण्याचे प्रमाण अधिक

September 11, 2021
0

...

Read more

Bank Holidays | मोठी बातमी ! उद्यापासून 3 दिवस बँका बंद राहणार

6 days ago

High Cholesterol | पायांवर दिसत असतील हाय कोलेस्ट्रॉलचे ‘हे’ संकेत तर दुर्लक्ष करण्याची कधीही करू नका चूक; जाणून घ्या

3 days ago

Benefits Of Walnuts | उन्हाळ्याच्या दिवसात ड्रायफ्रुट खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे; जाणून घ्या सविस्तर

5 days ago

Pune Municipal Corporation (PMC) | शहरातील 5 व्या आणि 6 व्या मजल्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पुणे मनपाने घेतलं 3 कोटींचं मशीन

6 days ago

Rakesh Jhunjhunwala Portfolio | राकेश झुनझुनवाला यांच्या पसंतीच्या बँक शेयरमध्ये होईल मोठा पैसा, आता स्वस्त दरात मिळतोय स्टॉक !

3 days ago

Skin Care Tips | उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची घ्या काळजी ! कोरफड आणि भाताचे पाणी वापरा अन् त्वचा ठेवा चमकदार

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat