पुणे (शिवाजीनगर) : बहुजननामा ऑनलाईन – शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांची अटीतटीची लढत मानली जात होती. परंतू अबू आझमी यांनी मताधिक्याने विजय मिळवला. अबू आझमी यांनी २५,६०१ मतांनी विजय मिळवला. या मतदारसंघातून अबू अझमी हे २५ हजार मतांनी आघाडीवर होते. विठ्ठल लोकरे यांच्यासाठी शिवसेनेने जोरदार प्रचार केला होता.
मागील विधानसभा निवडणुकीत मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सपाच्या अबू आझमी यांनी ४१ हजार ७१९ एवढी मते घेत विजय मिळवला. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना चे सुरेश पाटील होते. त्यांना ३१ हजार ७८२ मते मिळाली आणि त्यांचा ९ हजार ९३७ मतांनी पराभव झाला. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर काँग्रेस चे युसुफ अब्राहनी, चौथ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र वाघमारे आणि पाचव्या क्रमांकावर एमआयएम चे अल्ताफ काझी होते.
1. अबु आसिम आजमी (समाजवादी पार्टी) – ६९०८२ मते (विजयी उमेदवार)
2. विठ्ठल गोविंद लोकरे (शिवसेना) – ४३४८१ मते
3. मारुती (दादा) धर्मा गायकवाड (बहुजन समाज पार्टी) – २७३३ मते
4. आलमगीर अहमद आर रहमानी (पीस पार्टी) – ८०० मते
5. राकेश चंद्रकांत गायकवाड (बहुजन मुक्ति पार्टी) – ५३१ मते
6. सुरैया अकबर शेख (वंचित बहुजन अघाडी) – १०४५६ मते
7. खुरशेद नजीर खान (अपक्ष) ९४९ मते
8. खोत रविंद्र कृष्णा (अपक्ष) – ३२८८8 मते
9. बबन सोपान ठोके (अपक्ष) ३९७ मते
10. मोहम्मद सिराज मोहम्मद इकबाल शेख (अपक्ष) ९७८९ मते
11. NOTA – १८७६ मते
Visit : bahujannama.com