Abhishek Ghosalkar | अंगरक्षकाच्या पिस्तुलातून अभिषेकवर गोळीबार ! मेहूल पारेख, रोहित साहू यांना घेतले ताब्यात, आणखी एक पिस्तुल जप्त

Abhishek Ghosalkar

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Abhishek Ghosalkar | ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यासाठी मॉरिस याने आपल्या अंगरक्षकाच्या पिस्तुलाचा वापर केल्याचे पुढे आले आहे. याशिवाय मॉरिस याच्या कार्यालयात आणखी एक पिस्तुल पोलिसांना आढळून आले आहे. या गोळीबाराच्या वेळी तेथे उपस्थित असलेले मेहूल पारेश, रोहित साहू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हा गुन्हा मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. (Mumbai Crime Branch)

मॉरिस याने अभिषेक घोसाळकर यांना आपल्या कार्यालयात बोलावून यापुढे एकत्र काम करण्याविषयी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी एकत्र फेसबुक लाइव्ह केले. लाइव्ह संपत असताना मॉरिस बाहेर गेला. तो पिस्तुल घेऊन पुन्हा आत आला व त्याने गोळीबार केला. (Abhishek Ghosalkar Murder Case)

पोलिसांनी केलेल्या तपासात हा गोळीबार केला तेव्हा मेहूल पारेख, रोहित साहू हे बाहेरच उभे होते.
फेसबुक लाइव्ह सुरु असताना मेहूल हा मॉरिसला खाणाखुणा करत होता. मॉरिसचा अंगरक्षक हा घरी जाताना आपल्याकडील पिस्तुल टेबलाच्या ड्राव्हरमध्ये ठेवतो, हे मेहूलला माहिती होते. त्यानेच हे मॉरिसला सांगितले होते. त्याप्रमाणे मॉरिस बाहेर आला व त्याने टेबलाच्या ड्राव्हरमधील पिस्तुल घेऊन पुन्हा आत जाऊन अभिषेकवर गोळीबार केला.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून मॉरिस याच्या कार्यालयाची झडती घेतली असता तेथे
आणखी एक पिस्तुल आढळून आले. यावरुन मॉरिस याने अगोदरच सर्व प्लॅन करुन ठेवल्याचे समोर येत आहे.