Abdul Sattar | बारामती कृषी प्रदर्शनावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची स्तुतीसुमने; म्हणाले…

Abdul Sattar | agriculture minister abdul sattar visited baramati agricultural exhibition

बारामती : बहुजननामा ऑनलाईन  बारामती येथील कृषीप्रदर्शन (Baramati Agriculture Exhibition) पाहून मी भारावून गेलो, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे वडील राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांचे देखील तोंडभरून कौतुक केले. इतक्या हाय टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन कुठेच भरत नसून फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील शेतकऱ्यांनी हे कृषी प्रदर्शन पहायला यायला पाहिजे. असेही यावेळी बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शेतीमध्ये वर्षभरात आपण नवनवीन प्रयोग केले पाहिजे. याची येथे माहिती मिळते. तसेच राजेंद्र पवार यांनी येथील शेतीत वेगवेगळे प्रकल्प राबविले आहेत. त्यांच्याकडे विविध जातीच्या गाया म्हशी आहेत. जर अशा प्रकारचे प्रकल्प दुश्काळी आणि आत्महत्याग्रस्त भागासाठी राबविले तर त्याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होईल. जर आमचा यांच्याशी करार झाला तर त्याचा फायदा निश्चितच विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल. इथे शेतीसोबतच जोडधंदा कसा करावा याची माहिती मिळेल. राजेंद्र पवार यांचे या क्षेत्रातील योगदान हे विसरता येणार नाही. असेही यावेळी बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आवर्जून हे कृषी प्रदर्शन पहावे. तसेच, मी सिल्लोड येथे भरविलेल्या कृषी प्रदर्शनापेक्षाही किती तरी मोठे कृषी प्रदर्शन बारामतीत भरविले आहे. नक्कीच येथून मी काहीतरी नवीन शिकून जाईल. असेही यावेळी बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

 

दरम्यान, या कृषीप्रदर्शनास राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देखील भेट दिली. यावेळी त्यांनी विविध शेतीविषयक नाविण्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (Agriculture Development Trust Baramati), बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्र, अटल इन्क्युबेशन सेंटर, माइक्रोसॉफ्ट व लंडन ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिक २०२३ या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन १९ ते २२ जानेवारी दरम्यान खुले राहणार आहे.
यावेळी ३ ते १८ जानेवारी दरम्यान स्टार्टअप किंवा इतर इन्व्होवेटर यांच्याकरिता वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
मायक्रोसॉफ्टमार्फत बारामती येथे उभारण्यात येणाऱ्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज’ या
कृषी संशोधन प्रकल्पातील अनेक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना, उद्योजकांना दाखवण्यात येणार आहेत.

 

सुमारे १७० एकरावर कृषिक २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शेतकऱ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स,
आयओटी, प्रिसिसीअन अॅग्रीकल्चरल, व्हर्टिकल फार्मिंग, ग्रामीण शेतकरी, रोबोटचा कृषी क्षेत्रात वापर,
दुग्ध आणि फळप्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेस,
दूध आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग, मिलेट दालन असे अनेक उपक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Abdul Sattar | agriculture minister abdul sattar visited baramati agricultural exhibition

 

हे देखील वाचा :

Rakhi Sawant | बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला अटक; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Satyajit Tambe | डॉ. सुधीर तांबेंपाठोपाठ सत्यजीत तांबेंची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; एमईएस क्रिकेट क्लबचा विजयी षटकार, इऑन वॉरीयर्स संघाचा तिसरा विजय