नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये निवडणूक निकालामध्ये सुरुवातीलाच आम आदमी पक्षाच्या झाडुची जादू कायम असल्याचे दिसून आले. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला फक्त 3 जागा मिळाल्या होत्या. 50+ जागेवर आपला विजय मिळेल असे दिसत आहे. सध्या, 54 जागांवर आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे. तर भाजपला अपेक्षित जागा मिळाली नाही.
मात्र आम आदमी पक्षाचा विजय निश्चित होताच आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील पक्षाच्या कार्यालयात गर्दी केली आणि विजयी जल्लोष साजरा केला. त्याचबरोबर केजरीवाल यांच्या घरात देखील गर्दी केली आहे. पक्षाकडून लाडूची ऑर्डर देखील देण्यात आली आहे. केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना फटाके न फोडण्याचे आवाहन दिले आहे. केजरीवाल यांच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.
https://twitter.com/AamAadmiParty/status/1227097503943680000
केजरीवाल यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्युनियर केजरीवाल पोहचला आहे. गळ्यात मफलर, डोक्यावर टोपी, डोळ्यावर चष्मा आणि मिशी लावून चिमुकला अरविंद केजरीवाल यांचे रुप घेऊन यंदाच्या निवडणुकीचे आकर्षण बनला होता. सध्या तो ज्युनियर केजरीवाल नावाने फेमस आहे. आपनेही या ज्युनियर मफलरमॅनचा फोटो शेअर केला आहे. दिल्ली निवडणूक निकालांमध्ये आपचा विजय झाल्यास दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा केजरीवाल यांचे सरकार बनणार आहे. दिल्लीकरांसाठी 5 वर्ष काम केल्यामुळे आपचा विजय निश्चित असल्याचे मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ‘दिल्लीत विजय होणार याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे. कारण गेल्या पाच वर्षात आम्ही इथल्या लोकांसाठी काम केली आहेत’, असे देखील म्हंटले आहे.