मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Aamir Khan |अभिनेता अमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. 15 वर्षे संसार केल्यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अमिर खान (Aamir Khan) नंतर आता त्याचा भाऊ हैदर अली (Haider Ali Khan) याचा देखील घटस्फोट झाल्याचे समोर येत आहे. हैदर अली खान याने पत्नी आणि लहान पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री इव्हा ग्रोव्हर (Eva Grover) सोबत घटस्फोट घेतला आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच चित्रपटात देखील ती दिसली होती.
दोघांचा झाला होता प्रेमविवाह
हैदर अली खान आणि इव्हा ग्रोव्हर यांचा प्रेमविवाह झाला होता. हैदर हा बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक(Famous Bollywood director) ताहीर हुसेन (Tahir Hussain) यांचा मुलागा आहे. तर अभिनेता अमिर खान याचा सावत्र भाऊ आहे. हैदरने ‘दिल तो दिवाना है’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हैदर आणि इव्हा यांना एक मुलगी आहे.
https://www.instagram.com/p/
इव्हाचे गंभीर आरोप
इव्हा आणि हैदर यांचा विवाह झाल्यानंतर एक वर्षानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले या वादाचे रुपांतर घरगुती हिंसेत झाले. इव्हाने त्यांचा संसार टिकवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते शक्य झाले नाही. इव्हाने हैदरवर घरगुती हिंसेचे आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. टीव्ही अभिनेत्रीने केलेल्या आरोपांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
म्हणून हा निर्णय घेतला
इव्हाने एका मुलाखतीत सांगितले होते की, 2008 मध्ये तिने हैदरपासून घटस्फोट घेतला. हा खूप कठीण प्रसंग होता. परंतु रोजच्या हिंसेपासून सुटका हवी होती. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे इव्हाने सांगितले.
इव्हाने फेसम शो ‘ऑफिस-ऑफिस’ (Office-Office) आणि ‘माय फ्रेंड गणेशा’ (My Friend Ganesha) यामध्ये काम केले आहे. इनटॉलरेंसच्या मुद्यावर ज्यावेळी अमिर खानने विवादास्पद वक्तव्य केलं होतं. त्यावेळी हैदर अमिरच्या मदतीला धावून गेला होता. तेव्हा हैदरवर टीका झाली होती. नुकताच अमिर आणि किरण राव यांचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे हैदर देखील चर्चेत आला आहे.
web title: Aamir Khan | ‘Akele Hum Akele Tum’ Aamir Khan’s brother also divorced, his wife made ‘these’ serious allegations
Pune Crime News | सिगारेट मागितल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने सपासप वार
Pune News | वारजेतील सारस अर्बन सोसायटीच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करा; कोर्टाचे पोलिसांना निर्देश