पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Aam Aadmi Party Pune | पुणे शहरातील (Pune) नगरसेवकांचे सौजन्य व संकल्पनेचे बोर्ड महापालिकेने (Pune Municipal Corporation-PMC) त्वरित काढून टाकावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करत बोर्ड हटवण्याची मोहिम सुरु करण्यात येईल, असा इशारा पुणे आम आदमी पक्षाकडून (Aam Aadmi Party Pune) देण्यात आला आहे. हे बेकायदेशीर बोर्ड काढून टाकण्याचा व झाकण्याचा खर्च नगरसेवकांकडून वसूल करावा अन्यथा निवडणूक खर्चात ग्राह्य धरावा. पुणेकरांच्या कराच्या पैशातून ह्या बोर्डची बिले मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी आपने केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बेकायदेशीर बोर्ड पुणे महापालिका प्रशासनाने (Pune Municipal Administration) तातडीने काढून टाकावेत. ते बोर्ड लावण्याचा व काढण्याचा खर्च ह्या नगरसेवकांकडून वसूल करावा. ह्या लक्षावधी बेकायदेशीर बोर्डांची बिले मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागण्या करत आज आप पक्षातर्फे आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आपचे राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे (Dr. Abhijit More), पुणे शहर संघटक एकनाथ ढोले (Eknath Dhole), खडकवासला विधानसभा महिला अध्यक्षा ज्योती ताकवले (Jyoti Takwale), बिबवेवाडी विभाग समन्वयक घनश्याम मारणे (Ghanshyam Marane), पियूष हिंगणे (Piyush Hingane), किरण इंगळे (Kiran Ingle), इरफान रोड्डे (Irfan Rodde), शैलेश मोहिते (Shailesh Mohite) उपस्थित होते. (Aam Aadmi Party Pune)
नगरसेवकांच्या नावाचे बोर्ड लावणे हे बेकायदा कृत्य आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. तसेच सार्वजनिक मालकीवर केलेले अतिक्रमण व फुकटची जाहिरात आहे. आता पुणे मनपा निवडणुका आल्यावर आचारसंहिता काळात हे बोर्ड झाकण्यासाठी पुन्हा पालिकेला पुणेकरांचे कोट्यवधी रुपये खर्च करावे लागणार आहेत. ह्यांचे बोर्ड लावण्यासाठी आणि प्रत्येक मनपा, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हेच बोर्ड झाकण्यासाठी कोट्यवधी रुपये पुणेकरांचे का खर्च करायचे? असा सवाल आम आदमी पक्षाकडून करण्यात येत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, मनपा निवडणूक आचारसंहिता काळात हे बोर्ड झाकण्याचा खर्च पुणे मनपाला करावा लागल्यास
तो खर्च देखील सदर नगरसेवकांकडून वसूल करावा.
जर ह्या वसुलीला नगरसेवक विरोध किंवा टाळाटाळ करत असतील तर सदर खर्च त्यांच्या
निवडणूक खर्चात ग्राह्य धरावा यासाठी पुणे मनपा आयुक्तांनी
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे (State Election Commission) पत्रव्यवहार व पाठपुरावा करावा,
अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
Web Title :- Aam Aadmi Party Pune | Pune Municipal Corporation courtesy of city corporators and concept boards should be removed; – Demand for AAP Pune
हे देखील वाचा :
Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोने आणि चांदीचा भाव घसरला; जाणून घ्या