नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकेत खाते उघडणे असो अथवा टॅक्स वाचविण्यासाठी म्यूच्युअल फंड स्कीममध्ये पैसे गुंतवणे, या सर्वासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. यासाठी आधार जारी करणारी सरकारी संस्था युआयडीएआयने याच्याशी संबंधित सेवा अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. युआयडीएआयने आधारमधील आपला पत्ता बदलण्यासाठी नव्या सेवेची घोषणा केली आहे. आता तुम्ही घरबसल्या पत्ता बदलू शकता.
आधारमध्ये सहज करू शकता अॅड्रेस अपडेट
युआयडीएआयने यासंबंधित एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत घराचा पत्ता बदलण्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. युआयडीएआयने ट्विट करून सांगितले आहे की, प्रथम वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा आणि Online Address Update वर क्लिक करा. योग्य पत्ता टाका आणि संबंधित कागदपत्रातंची रंगीत स्कॅन केलेली फाइल अपलोड करा. यासाठी रांग लावायची गरज नाही, शुल्क नाही, काही क्लिक्समध्ये तुमचा पत्ता अपडेट होईल.
ऑनलाइन आधार अॅड्रेस असा बदला…
(स्टेप- 1)
प्रथम UIDAI ची वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जा. येथे आपल्याला My Adhaar टॅब दिसेल. ड्रॉपडाऊनमधील दुसरे टॅब Udate Your Aadhaar मध्ये जाऊन त्याच्या ड्रॉपडाऊनमध्ये तिसरे ऑपशन Update your address online वर क्लिक करा.
(स्टेप-2)
यावर क्लिक करताच नवीन पेज उघडेल. येथे खाली गेल्यानंतर Proceed to Update Address वर क्लिक करा. पुन्हा एक नवीन पेज उघडेल.
(स्टेप-3)
या पेज वर प्रथम तुमचा आधार नंबर, नंतर कॅप्चा वेरिफिकेशन टाकून खाली Send OTP वर क्लिक करा. आता तुमच्या आधार रजिस्टर्ड नंबरवर एक ओटीपी येईल. तो Enter OTP/TOTP च्या खाली टाका. आणि खाली Login वर क्लिक करा.
(स्टेप-4)
या पेज वर आता Update Address via Address Proof, Update Address via Secred Code चा पर्याय देण्यात आला आहे. अॅड्रेस प्रूफ चा पर्याय निवडल्यानंतर नवीन पेजमध्ये तुम्हाला नव्या अॅड्रेसचे डिटेल्स भरावे लागतील. नंतर योग्य ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
Visit : bahujannama.com