मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आता आपण सहजपणे आधार कार्डवर आपला लेटेस्ट फोटो अपडेट करू शकतो. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट सबमिट करायची गरज नाही. इतकेच नाही तर तुम्ही तुमचा बायोमेट्रिक, नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीसुद्धा सहज अपडेट करू शकता. यासाठी, आपल्याला फक्त आपल्या जवळच्या आधार सेंटरवर जावे लागेल.
कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही
यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नोटीस बजावत माहिती दिली आहे. या मध्ये असे सांगितले आहे की, आधार कॉर्ड धारकांची वैयक्तिक माहिती अपडेट करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट सबमिट करण्याची आवश्यकता नाही.
जे आधार कार्ड यूजर्ससाठी आपला फोटो, बायोमेट्रिक, मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी बदलू इच्छित आहेत, त्यांना त्यांचे आधार कार्ड घ्यावे लागेल आणि जवळच्या आधार सेवा केंद्रात जावे लागेल. आपण यूआयडीएआयच्या अधिकृत साइटला भेट देऊन आधार सेवा केंद्रासाठी अपॉईंटमेंट घेऊ शकता.
आधार सेवा केंद्रात हे काम केले जाईल
यापूर्वी एका ट्विटमध्ये यूआयडीएआयने सांगितले होते की आपल्या आधार कार्डमधील नाव, पत्ता आणि जन्मतारीख बदलण्यासाठी कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील. यूआयडीएआयची आधार सेवा केंद्रे वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत. येथे आपण आधार नोंदणी, नाव, पत्ता, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, जन्म तारीख, लिंग आणि बायोमेट्रिक डेटा अपडेट करू शकता.
आधार अपडेट करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा
आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आधार सेवा केंद्रात आपण एकदा जन्म तारीख अपडेट करू शकता, दोनदा नाव आणि फक्त एकदा लिंग.