नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्डची अपडेटेड हिस्ट्री जाणून घेणे आता सोपे झाले आहे. आधार कार्ड जारी करणारी संस्था यूनिक आयडेंटीकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) च्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही आता डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक अपडेटची अनुक्रमे हिस्ट्री जाणून घेऊ शकता. यूआयडीएआयने ट्विटरवर ट्विट करून आधार अपडेट करणे आणि अपडेट हिस्ट्री तपासण्याची पद्धत सांगितली आहे. यूआयडीएआयने एक ट्यूटोरियल व्हिडिओद्वारे सर्व माहिती दिली आहे.
अशी पहा 6 महिन्यांची हिस्ट्री
1 प्रथम यूआयडीएआयची वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
2 आधार अपडेट हिस्ट्री लिंक वर क्लिक करा.
3 यामध्ये डेमोग्राफिक नाव, पत्ता, लिंग, ईमेल आयडी, मोबाइल नंबर आणि बायोमेट्रिकचा समावेश आहे.
4 आधार नंबर किंवा वर्च्युअल आयडी आणि सिक्युरिटी कॅप्चा भरा.
5 सिक्युरिटी कॅप्चा टाकताच तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर वन टाइम पासवर्ड येईल.
6 ओटीपी टाकताच यूजर आपली हिस्ट्री पाहू शकतो.
यासाठी आहे उपयोगी
हे फीचर लोकांना मागील 2 किंवा 3 वर्षांत उल्लेखित डिटेल्समध्ये झालेल्या बदलांची माहित देते, विशेषकरून अॅड्रेसमध्ये झालेल्या बदलाबाबत. या फिचरच्या मदतीने आधार कार्डधारक नोकरी, शाळा अॅडमिशन, किंवा दुसर्या गोष्टींसाठी आपल्या हिस्ट्रीचा वापर करू शकतो. आधार अपडेट हिस्ट्री डाऊनलोड सुद्धा करता येऊ शकते.