नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Card Number जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यूजर्सला नामांकन आयडी (EID) चा वापर करून आधार कार्डची (Aadhaar Card) नामांकन स्थिती तपासण्याची परवानगी देते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
EID नामांकन/अपडेट पावतीच्या टॉपवर दिसते आणि यामध्ये नामांकनाची 14 अंकी संख्या (1234/12345/12345) आणि 14 अंकाची तारीख आणि वेळ (dd/mm/yyyy hh:mm:ss) असते. या 28 अंकातून EID तयार होतो. जर यूजरकडून EID हरवले असेल तर रजिस्टर्ड मोबाइल नंबरद्वारे हरवलेला EID पुन्हा मिळू शकतो.
Paytm सारख्या वॉलेटमधून सुद्धा खरेदी करू शकता ‘इश्यू’, SEBI ने दिली परवानगी
अशी ऑनलाइन चेक करा आधार कार्ड नामांकन स्थिती
1 : UIDAI ची अधिकृत वेबसाइट- uidai.gov.in वर जा.
2 : ’माय आधार’ पर्यायवर जा आणि क्लिक करा.
3 : ’आधार स्थिती’ तपासा पर्यायावर क्लिक करा.
4 : एक नवीन पेज उघडेल, जिथे यूजरला नामांकन आयडी, नामांकनाची तारीख आणि वेळेचा सिक्युरिटी कोड नोंदवावा लागेल.
5 : आता, चेक स्टेटस बटनवर क्लिक करा.
6 : आधार जनरेट होण्याच्या स्थितीत यूजरला ई-आधार ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी एक मेसेज मिळेल. जर नाही तर अपडेटच्या स्थितीत दिसेल.
Web Title : Aadhaar Card | how to check enrollment status of aadhaar card using number
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Maharashtra Police | राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल, सर्वच अप्पर महासंचालकांचं (ADG) ‘समाधान’ होणार !