नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षाचा पहिला महिना जवळपास संपला आहे. यासोबतच मुलांच्या अॅडमिशनची प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे. आई-वडील आपल्या मुलांना आवडत्या शाळेत अॅडमिशन घेण्यासाठी धावपळ करू लागले आहेत. मुलांच्या अॅडमिशनसाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते, यामध्ये आधार कार्डसुद्धा आहे. याच कारणामुळे युआयडीएआय या आधार कार्ड तयार करणार्या संस्थेकडे मागील काही दिवसात मुलांच्या आधारसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत.
5 वर्षांच्या वयाच्या मुलांसाठी
आधार कार्ड 5 वर्षांपेक्षा छोट्या किंवा मोठ्या मुलांचे तयार केले जाऊ शकते. जर तुमचा मुलगा 5 वर्षांपेक्षा छोटा आहे, तर तुम्हाला त्याच्या जन्म दाखल्याची आवश्यकता आहे. जर जन्मदाखला नसेल तर आई-वडीलांच्या आधार कार्डाद्वारे सुद्धा मुलाचे आधार तयार केले जाऊ शकते. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही. परंतु, जेव्हा त्याचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त होते तेव्हा बायोमेट्रिक रेकॉर्ड अपडेट करावा लागतो.
5 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी
जर मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त असेल तर यासाठी तुम्हाला शाळेचे मुख्याध्यापक आणि गावचे सरपंच अथवा सदस्याचे पत्र आवश्यक आहे. आधार कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी हे डॉक्युमेंट्स प्रथम जमा करा. 5 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांच्या अर्जादरम्यान बायोमेट्रिक रेकॉर्ड सबमिट केला जातो. परंतु, 15 वर्षानंतर पुन्हा तो अपडेट करावा लागतो.
असा करा अर्ज.
मुलाचे आधार कार्ड तयार करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा आधार सेवा केंद्र जा
1. आधार एन्रॉलमेंट सेंटर किंवा आधार सेवा केंद्रात जाऊन तुम्हाला एक एन्रॉलमेंट फॉर्म भरावा लागेल.
2. जर तुमच्या मुलाचा वॅलिड अॅड्रेस प्रुफ नसेल तर आई-वडीलांचा आधार नंबर भरा.
3. सर्व आवश्यक डॉक्युमेंट्ससह तुम्हाला हा फॉर्म सुद्धा भरावा लागेल.
4. हा फॉर्म जमा केल्यानंतर मुलाचे बायोमेट्रिक रेकॉर्ड द्यावे लागेल. यामध्ये हाताच्या दहा बोटांची फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन आणि फोटो घेतला जातो.
5. जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते, त्यानंतर तुम्हाला एक एन्रॉलमेंट स्लिप जनरेट करून दिली जाते.
6. या एन्रॉलमेंट स्लिपवर एन्रॉलमेंट आयडी, नंबर आणि तारीख असते.
7. या एन्रॉलमेंट आयडीच्या मदतीने तुम्ही आधार स्टेटसबाबत माहिती घेऊ शकता.
8. आधार एन्रॉलमेंटच्या 90 दिवसांच्या आत आधार अर्जदाराच्या घरी पोस्टाने पाठवण्यात येते.
Visit : bahujannama.com