Pankaja Munde On Dhananjay Munde | घरा घरात चपटीची बॉटल देणारा नेता पाहिजे की पाणी देणारा?, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेवर घणाघाती टीका

a person without character is a villain in politics pankaja munde on dhananjay munde

परळी : बहुजननामा ऑनलाईन  Pankaja Munde On Dhananjay Munde | भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी परळी दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे (MLA Dhananjay Munde) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. घरा घरात चपटीची बॉटल देणारा नेता पाहिजे की पाणी देणारा नेता? असा सवाल उपस्थित करत चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणातली व्हिलन असते, असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना लगावला. (Pankaja Munde On Dhananjay Munde)

 

बीडच्या परळी येथील कौठाळी गावात जल जीवन मिशन योजनेचा शुभारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, परळी शहरातील भुयारी गटारयोजनेच्या नावाखाली चांगले रस्ते फोडले आणि म्हणे विकास केला. तुम्हाला नेमका कसा नेता पाहिजे तर तुमाला भुषण वाटवे अशा नेतृत्वाची गरज आहे. पुढची पिढी घडवणारा नेता पाहिजे की, पुढची पिठी वाया घालवणारा नेता पाहिजे. घरात पाणी देणारा नेता पाहिजे की घरा घरात चपटीची बॉटल देणारा नेता पाहिजे, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता निशाणा साधला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणातील व्हिलन
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, मुंडे साहेबांच्या नंतर तुम्ही सगळे कोणाचं नाव घेता माझं, कारण तुम्हाला कुशल आणि चांगला नेता तुम्हाला पाहिजे.
मी निवडणुकीत हरल्यापासून तुम्हाला मोबाईलवर मेसेज येणं बंद झाले. पैसे वाटणारा, तमाशा दाखवणारा,
मतं विकत घेणारा भ्रष्टाचार करणारा, खोटे गुन्हे दाखल करणारा, चारित्र्यहीन व्यक्ती ही राजकारणातील व्हिलन असते,
असा टोला त्यांनी धनंजय मुंडेंना लगावला.

 

Web Title :- a person without character is a villain in politics pankaja munde on dhananjay munde

 

हे देखील वाचा :

Pune PMPML News | फुकट्या प्रवाशांना पीएमपीएमएलचा दणका, दंडाच्या रक्केम मोठी वाढ

Former MLA Suryakant Desai Passed Away | रस्त्यात अ‍ॅम्ब्युलन्स बंद पडली, उपचाराअभावी सेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे निधन

Chhatrapati Sambhaji Nagar Accident | एसटी आणि गॅस सिलेडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोमध्ये भीषण अपघात, 10 जणांची प्रकृती चिंताजनक; टेम्पो चालकाचा मृत्यू