नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – एका शिक्षकाने पत्नी आणि तीन मुलांचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात शनिवारी सकाळी उघडकिस आली. पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. त्याने आर्थिक समस्या आणि डिप्रेशनमुळे पत्नी आणि मुलांचा खून केल्याचे समोर आले आहे.
उपेंद्र शुक्ला असे शिक्षकाचे नाव आहे. तर त्याने पत्नी अर्चना शुक्ला आणि सात वर्षांची व दीड वर्षांची मुलगी आणि ५ वर्षांचा मुलगा यांचा गळा चिरून त्याने खून केला.
असा उघडकिस आला खूनाचा प्रकार
उपेंद्र खासगी शिकवणी घेतो. त्याची आई तो राहतो त्याच इमारतीत राहण्यास आहे. ती सकाळी त्याच्या घरी आली तेव्हा उपेंद्र दरवाजा उघडत नसल्याचे पाहून तिने शेजाऱ्यांना सांगितले. त्यांनी पोलिसांना फोन केला. तेव्हा त्याने पत्नी दोन मुली, मुलाचा गळा चिरून खून केला. त्यानंतर या सगळ्या प्रकाराला वाचा फुटली.
चिठ्ठी लिहिली
उपेंद्रने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यात एक हिंदी आणि एक इंग्रजी मेसेज लिहिलेला आहे. त्यात त्याने खून का केला याची हकिकत लिहीली आहे. तर या सर्व खूनांसाठी मी जबाबदार असल्याचे त्याने म्हटले आहे.
डिप्रेशनमध्ये होता उपेंद्र
उपेंद्रच्या पत्नीला मधुमेह होता. तसेच त्याच्यासमोर अनेक आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये होता.