बहुजननामा ऑनलाइन टीम – व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीनंतर टेलिग्रामला बराच फायदा झाला आहे. पण टेलिग्राम वापरकर्त्यांना टेलिग्रामवर त्यांच्या व्हॉट्सअॅप डेटाचा बॅक अप घेण्यास बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता कंपनीने आपल्या नवीन ग्राहकांच्या सोयीसाठी बॅकअप फीचर जारी केले आहे. टेलिग्रामने आपल्या आयओएस अॅपसाठी माइग्रेशन टूल लॉन्च केले आहे, ज्याच्या मदतीने व्हॉट्सअॅप किंवा इतर कोणत्याही मेसेजिंग अॅपवरून टेलिग्रामवर डेटा बॅक अप घेतला जाऊ शकतो. टेलिग्रामचे हे नवीन अपडेट आयओएएसच्या आवृत्ती 7.4 मध्ये आहे, दरम्यान, आणखी एक अपडेट (टेलिग्राम 7.4.1) लवकरच येणार आले, ज्यात मायग्रेशन टूल संदर्भात कोणतीही चर्चा नाही. नव्या अपडेटच्या माध्यमातून वापरकर्ते त्यांच्या व्हॉट्सअॅप अकाउंटचा संपूर्ण डेटा टेलिग्रामवर ट्रान्सफर करू शकतात.
टेलिग्रामवर व्हॉट्सअॅप डेटा बॅकअप कसा घ्यावा?
आपणास टेलिग्रामवर आपले व्हॉट्सअॅप अकाऊंट बॅकअप घ्यायचे असेल तर व्हॉट्सअॅपमध्ये कोणतेही चॅट राईट टू लेफ्ट स्वाइप करा. यानंतर आपण More च्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट चॅटचा पर्याय मिळेल. यानंतर आपल्याला विचारले जाईल की आपणास अटॅचमेंटशिवाय बॅकअप घ्यायचा आहे की अटॅचमेंटसह. यानंतर, आपण टेलिग्राम निवडून चॅटचा बॅक अप घेऊ शकता.