नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २२ वर्षीय युवतीने तक्रार दिली की तिच्या फयाज नावाच्या युवकाने तिच्यावर अत्याचार केला आहे तो युवक युवती पेक्षा एक वर्ष लहान असल्याने परिसरात चर्चेला उत आला आहे.युवतीवर अत्याचार करणाऱ्या २१ वर्षीय युवकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २२ वर्षीय युवतीने तक्रार दिली की, डिसेंबर २०१७ मध्ये फय्याज खान हबीब खान (21) या युवकाने माझा घरी मी एकटीच असतांना फय्याज खान घरी आला. त्याने माझ्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्या दिवशी तो मला धमकी देवून निघून गेला. पुढे १ मार्च २०१९ रोजी सकाळी माझी आई विट भट्टीवर गेली मी तिचे जेवण घेऊन ९ वाजता जात असतांना फय्याज खान मला रस्त्यात मोटारसायकलवर भेटला. त्यावेळी त्याने मला त्याच्या गाडीवर बसण्यास सांगितले. त्यानंतर सायंकाळी मी केलेले कृत्य कोणाला सांगितलेतर तुला जीवे मारून टाकीन असे सांगितले.
सायंकाळी ही घटना मी आईला सांगितली होती आणि मी आईसोबत पोलीस स्टेशनला जात असतांना फय्याज खान आणि शेख गफार दोघे आले आणि पोलीस स्टेशनला जावू नका असे आम्हाला सांगितले. माझ्या घरच्या लोकांनी फय्याज खानला लग्नासाठी विचारले असता त्याने नकार दिल्यानंतर मी तक्रार देत आहे असे FRI मध्ये लिहिलेले आहे.आज दि. ९ मार्च रोजी या गुन्ह्याचा तपासीक अंमलदार पोलीस उपनिरिक्षक रोहिणी नप्ते सहकारी पोलीस जमादार यांनी फय्याज खानला न्यायालयात हजर केले. सहाय्यक सरकारी वकील भालेराव यांनी या गुन्ह्यात पोलीस कोठडी देणे आवश्यक असल्याचा मुद्दा न्यायालयासमक्ष मांडला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फय्याज खानला तीन दिवस अर्थात १२ मार्च २०१९ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.तीन दिवसा नंतर न्यायालयातुन पुन्हा पी सी आर मिळेल का एम सी आर याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे