पाटणा : वृत्त संस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लावलेल्या संचारबंदी दरम्यान एक महिला पोलीस कर्मचारी तिच्या छोट्या मुलाला कडेवर घेऊन कर्तव्य बजावत आहे. ही महिला आईसोबच खाकी वर्दीतील कर्तव्य जबाबदारीने पार पाडत आहे. मध्य प्रदेशातील गुना येथील हा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यांचे कौतुक होत आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलीस अधीक्षक राजीव कुमार मिश्रा यांनी तत्काळ या महिला पोलीस कर्मचा-याची फिल्ड ड्युटी रद्द केली असून पुन्हा ठाण्यात कामासाठी बोलावले आहे. कठीण परिस्थितीत आपले कर्तव्य बजावून या महिला पोलिसाने उदाहरण घालून दिले आहे. त्यामुळे खाकी वर्दीतल्या आईच्या समर्पणाला सर्वजण सलाम ठोकत आहेत.
दीपम गुप्ता असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या गुना पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कोरोना संचारबंदीमध्ये अन्य पोलिसांसोबतच दीपम यांचीही फिल्डवर ड्युटी लावण्यात आली. त्यांना पोलीस ठाण्यात मोबाईल युनिटमध्ये पाठवले गेले. कर्तव्य बजावताना दीपम खाकीवर्दीसह आई असल्याचीही जबाबदारी पार पाडत आहेत. लहान मुलाला सोबत घेऊन ड्युटी करणाऱ्या दीपम यांना अन्य पोलीस कर्मचारीही मदत करत आहेत. गरज पडल्यास तेही या छोट्या मुलाला कडेवर घेऊन खेळवत आहेत. लहान मुलाच्या खाण्यापिण्याचीही सोय करत आहेत. दरम्यान कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र दीपम यांनी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर केली नाही. खरे तर महिला पोलीसांनी कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावणे ही काही नवीन बाब नाही. तरीही कोरोनाचा संसर्ग वाढताना जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत लहान मुलाला कडेवर घेऊन ड्युटीवर येणे ही