बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड अक्ट्रेस माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सोशल मीडियावरून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. वयाच्या 52 व्या वर्षी देखील ती खूपच यंग अँड ब्युटीफुल दिसत आहे. आपल्या फोटोंमुळं देखील माधुरी अनेकदा चर्चेत आली आहे. आजही तिच्या ब्युटीवर लाखो चाहते फिदा आहेत. पुन्हा एकदा आपल्या एका व्हिडीओमुळं तिनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ चोरीचा व्हिडीओ आहे. तिला हा व्हिडीओ पाहून हसू आवरेना झालं आहे.
माधुरीनं तिच्या ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच तिनं लाफिंग इमोजीही वापरली आहे. व्हिडीओत दिसत आहे की, सोन्याची चेन रस्त्यावर पडली आहे. मुंग्याचा समूह ही चेन खेचून नेत आहे. सोबत बॅकग्राऊंडला केजीएफ सिनेमातील डायलॉगही आहे. एका ट्विटर युजरनं शेअर केलेला व्हिडीओ माधुरीनं रिट्विट केला आहे.
https://twitter.com/MadhuriDixit/status/1374572976146804747?s=20
माधुरीनं शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांयायचं झालं तर 1984 साली आलेल्या अबोध या सिनेमातून तिनं हिंदी सिनेमात पाऊल टाकलं होतं. 1988 साली आलेल्या तेजाब या सिनेमानं तिला ओळख मिळाली. राम लखन, परिंदा, दिल, साजन, बेटा, खलनायक, हम आपके है कौन, दिल तो पागल है, देवदास यांसारख्या सिनेमात अप्रतिम अभिनय करणाऱ्या माधुरीनं हिंदी सिनेमात आपलं वेगळं स्थान तयार केलं आहे. आजा नचले, डेढ इश्किया, बॉम्बे टॉकीज, गुलाब गँग, कलंक आणि टोटल धमाल अशा अनेक सिनेमात भूमिका साकारणारी माधुरी आता लवकरच तिचा डिजिटल डेब्यू करणार आहे. नेटफ्लिक्सवरील फाईंडींग अनामिका या वेब सीरिजमध्ये ती काम करताना दिसणार आहे. संजय कपूर देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.