बहुजननामा ऑनलाइन टीम – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग काही प्रमाणात कमी होत आहे. असे असताना पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोनावर लस विकसित केली. पण त्यानंतर आता सीरम इन्स्टिट्यूटने नोवाव्हॅक्स कंपनीसोबत मिळून कोरोना व्हायरसवर लस बनविण्याचा विचार सुरु केला आहे.
सीरम इन्स्टिट्यूटने ‘नोवाव्हॅक्स’ या कोरोना व्हॅक्सिनच्या चाचणीसाठी भारतात देशांतर्गत परिक्षणाची परवानगी मागितली आहे. त्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर यांच्याकडे अर्ज केला आहे. याबाबत ‘सीरम’चे प्रमुख आदर पुनावाला यांनी सांगितले, की आम्ही काही दिवसांपूर्वीच या लशीच्या चाचणीसाठी ड्रग कंट्रोलर कार्यालयात अर्ज केला आहे. त्यासाठी लवकर मंजूरी मिळायला हवी, अशी आशा आहे.
‘नोवॅक्स’ची लस प्रभावी
औषध निर्माता कंपनी नोवॅक्सने यापूर्वीच स्पष्टीकरण दिले, की त्यांच्याकडून तयार केलेली कोरोनावरील लस इंग्लंडमध्ये (UK) तिसऱ्या टप्प्यातील परिक्षणात 89.3 टक्के प्रभावी दिसली आहे.
ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी
कोरोनावरील नोवॅक्स कंपनीची लस अत्यंत प्रभावी आहे. ही लस ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावशाली असल्याचे सांगितले जात आहे.