बहुजननामा ऑनलाइन टीम – मानव रचना विद्यापीठ(एम आर यु)फरिदाबाद यांचे मानव रचना पीस अँड सस्टेनेबलिटी क्लब यांनी द ग्रीन व्हॅल्यू विक (Sustainable Gift Idea Competition)च्या अंतर्गत सस्टेनेबल गिफ्ट आयडिया कॉम्पिटीशन अँटीक्यू टू मॉडिश ही स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेत लासलगाव येथील शिवानी राजेंद्र होळकर हिने दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे.
या स्पर्धेमध्ये मानव रचना विद्यापीठासह भारतातील ५० इतर विद्यापीठांमधून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.या मध्ये आयआयटी दिल्ली,एन आय इ टी,ग्रेटर नोएडा,सेंट जोसफ गर्ल्स हायस्कूल सारख्या अनेक महाविद्यालयामधील विद्यार्थी होते.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.