बहुजननामा ऑनलाईन – देशभरातील लोक गणेशोसत्व मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. यात सामान्य लोकांपासून बॉलीवूड स्टार्सही गणपती बाप्पांच्या भक्तीत मग्न आहेत. काहींच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेत, काहीनी बाप्पांच्या विसर्जनाचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यात सारा अली खाननेदेखील नुकताच एक फोटो शेअर केला.
साराने गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीला भेट देताना एक फोटोही शेअर केला होता. या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा कुर्ता आणि क्रीम रंगाची लेगिंग्ज घातली आहे. सारा अगदी साध्या लूकमध्ये दिसत आहे. हे फोटो शेअर करताना साराने गणेश चतुर्थीनिमित्त प्रत्येकाला अभिनंदन केले. यात कॅप्शनमध्ये सर्वांना गणेश गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. यात तिने लिहीले आहे की, गणपती बाप्पा मोरया ! मला आशा आहे की, बाप्पा तुमच्या सर्व समस्या दूर करेल आणि तुमचे आयुष्य आनंदाने, सकारात्मकतेने आणि यशाने भरेल.
मात्र अनेक लोकांनी या फोटोसाठी तिला चांगलेच ट्रोल केले. लोकांनी त्याच्या फोटोवर घाणेरड्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात तिला काहीजण म्हणाले आहेत की, तू मुस्लिम आहेस तर तू गणपतीची पूजा करू नये. तर हिंदू म्हणाले की तुम्ही हिंदू बनले पाहिजे, तर काही जणांनी तिला मुस्लिमांची बदनामी करू नये, तर कोणी मुस्लिम म्हणून हे सर्व न करण्याचा सल्लाही दिला. पण तिला काही चांगल्या प्रतिक्रियाही मिळाल्या. यात काहींनी साराचे कौतुक करत तू हा उत्सव साजरा करत आहे म्हणजे नक्कीच चांगली बाब असल्याचे तिला सांगितले. सध्या सारा आणि कार्तिक आर्यनची मैत्री चर्चेत आहे. दोघेही बर्याचदा एकत्र दिसतात, दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. पण अद्याप या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल काहीही स्पष्ट सांगितले नाही.
https://twitter.com/mysarakhan/status/1168604595175772160?s=19