पुणे: Pune Lok Sabha Election Results 2024 | लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी असणार आहे. त्या अनुषंगाने विविध यंत्रणा कामाला लागल्याचे दिसत आहे. मतमोजणी होत असलेल्या काही ठिकाणी वाहतुकीत बदलही (Changes In Traffic Koregaon Park) करण्यात आला आहे.
या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी पुणे विभाग सज्ज झाला आहे. मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचे सीसीटीव्हीद्वारे रेकॉर्डिंग (CCTV Recording) होणार असल्याची माहिती मिळत आहे.सकाळी साडे आठ वाजता ईव्हीएम मतमोजणीची (EVM Machine) सुरूवात होणार असून मतमोजणीसाठी २ हजार ७० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बारामती, पुणे मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात होणार आहे. तसेच मतमोजणी केंद्रात मोबाईल आणण्यास मनाई करण्यात आलेली आहे.