पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | दसर्याला गावाकडे झालेल्या भांडणातून एकमेकांविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या होत्या. या भांडणाच्या रागातून चुलत भावाने साथीदारांच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात वार करुन त्याला जीवे मारण्याचा (Attempt To Kill) प्रयत्न केला. (Pune Crime)
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) ओंकार अनिल कोळपे Omkar Anil Kolpe (वय २०, रा. जांभळी – Jambhali , ता. भोर Bhor) व त्याच्या साथीदारांवर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अजित शंकर कोळपे (वय २६, रा. जांभळी, ता. भोर) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये (Bharti Hospital) उपचार करण्यात येत आहेत. ही घटना कात्रज येथील गुजरवाडी फाट्याच्या (Gujarwadi Katraj) अलिकडे चौगुले शोरुमसमोर रविवारी सकाळी सव्वा आठ वाजता घडली. (Pune Crime)
याबाबत शंकर तुळशीराम कोळपे (वय ५०, रा. जांभळी, ता. भोर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३३५/२२) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. फिर्यादी यांचा मुलगा अजित व त्याचा चुलत भाऊ ओंकार व चुलते अनिल कोळपे यांचे ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांच्या मुळगावी जांभळी येथे दसर्याचे भांडण झाले होते.
राजगड पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. अजित याची येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) सुटका झाली. त्यानंतर तो गुजरवाडी फाटा येथील सिद्धटेक इंजिनिअरींग येथे कामाला जात होता. यावेळी त्याला जुन्या कारणावरुन जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात व हातावर वार (Half Murder Case) करुन त्याला गंभीर जखमी केले. जखमीची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी अजित कोळपे याला भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पोलीस निरीक्षक संगीता यादव (Police Inspector Sangeeta Yadhav) तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :