नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – नाशिक येथे पोलिस दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नाशिक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये हजारो नाशिककरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये स्त्री-पुरुषानी मोट्या प्रमाणात सह्भाग घेऊन स्त्री-पुरुष समानतेचा आणि महिला सुरक्षीततेचा संदेश दिला.
गोल्फ क्लब मैदानापासून पहाटे ५ वाजता मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात झाली होती . यंदाच्या मॅरेथॉनमध्ये १० हजार हून अधिक नागरिकांनी नोंदणी केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ या सिनेमातील अभिनेता विकी कौशल याच्या प्रमुख उपस्थितीत या मॅरेथॉनला सुरुवात झाली.
नाशिककरांनी वाढत्या उन्हाची तमा न करता लहानमुले व बुजुर्ग व्यक्ती मोट्या संख्येने या मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते. नाशिककर उन्हांनी बेजार झाले असताना सुद्धा थंड पाण्याबरोबरच विविध थंड शीतपेये पिऊन स्वतःला दिलासा घेत स्त्री-पुरुष समानतेचा नारा देणारी नाशिक मॅरेथॉन शहराभारत पार पडली.