हैद्राबाद : वृत्तसंस्था – भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना हैद्राबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हैदराबादेतील बलात्कार आणि मर्डर प्रकरणातील पीडित कुटुंबास न्याय देण्याच्या मागणीसाठी तृप्ती देसाई या तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या घराबाहेर निदर्शन करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी,पोलिसांनी तृप्ती देसाई यांच्यासह त्यांच्या महिला समर्थकांना ताब्यात घेतलं.
तृप्ती देसाई यांनी सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी हैद्राबाद गाठलं. देसाई यांनी त्या प्रकरणातील आरोपींवर लवकरात लवकर कारवाईची मागणी तेलंगणा सरकारकडे केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांना प्रियांका रेड्डी बलात्कार प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयात जाब विचारण्यासाठी तृप्ती देसाई त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. मात्र, तृप्ती देसाईंसह भूमाता ब्रिगेडच्या ८ महिला पदाधिकाऱ्यांना हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ‘चंद्रशेखर राव यांना लग्नसमारंभात जायला वेळ आहे, पण पीडित कुटुंबीयांना भेट देण्यास वेळ नसल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय.
Visit : bahujannama.com