वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. गरोदरपणाच्या ८ मंहिन्यानंतर देखील एका महिलेने जीममध्ये हेव्ही वर्कआऊट अर्थात व्यायाम केला आहे. असे व्हिडिओ पाहून अनेकजणांना धक्का बसला आहे. याना मिलुटोनोविक (वय,३४) असे गर्भवती महिलेचे नाव आहे. वर्कआऊट करतानाचे या महिलेचे अनेक फोटो, व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित झाले आहेत.
View this post on Instagram
अमेरिकेतील याना मिलुटोनोविक हि महिला सध्या ८ महिन्यांची प्रेग्नंट आहे तिच्या डिलिव्हरीला काही दिवसच बाकी आहेत. गरोदर असल्याने योग्य ती काळजी घेणे आपल्या बाळाची काळजी घेणे यासाठी आराम करावा लागतो. मात्र, हि महिला चक्क जीममध्ये हेव्ही वर्कआऊट करत तब्बल १५० किलोचे वजन तिने उचलले आहे. ८ महिन्यांच्या पोटासह हेव्ही वर्कआऊट करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसेच इन्स्टाग्रामवर देखील व्हिडिओ प्रसारित झाले आहेत.
या दरम्यान, या एक अजब प्रकारावरून महिलेच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्याबाबतही चिंता वाटू लागली आहे. अशा वेगवेगळ्या कंमेंट त्या महिलेला समाज माध्यमातून येत आहे. तसेच या महिलेला ट्रोल केलं जातं आहे. एका युझरने अशा खतरनाक व्यायाम करून ही महिला आपल्या बाळाचा जीव घेऊ इच्छित आहे, का अशी प्रतिक्रिया देत आरोप केलाय. तसेच, असे आरोप होत असताना देखील तिने आणखी नवे व्हिडीओ शेअर केले आहेत.