पुणे : बहुजननामा ऑनलाइन – अॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत (Punit Balan Group Women’s Premier League) सायली लोणकर (Saily Lonakar) हिच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर न्युट्रीलिशियस् संघाने ऑक्सिरीच स्मॅशर्स संघाचा ७ गडी राखून पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला. (Punit Balan Group Women’s Premier League)
मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऑक्सिरीच स्मॅशर्स संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात केवळ ८२ धावा जमविता आल्या. तेजल हसबनीस (१७ धावा), श्रद्धा पोखरकर (१६ धावा) आणि जाई देवन्नावर (१३ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. सायली लोणकर हिने १५ धावात ३ गडी बाद करून भेदक गोलंदाजी केली. या शिवाय संजना वाघमोडे (२-१२) व आरती बाहेनवाल (२-१२) यांनीही अचूक गोलंदाजी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे आव्हान न्युट्रीलिशियस् संघाने १२.५ षटकात व ३ गडी गमावूण पूर्ण केले. गौतमी नाईक हिने नाबाद ३० धावा तर,
सायली लोणकर हिने नाबाद २३ धावांचे योगदान दिले व संघाने स्पर्धेत विजयी सलामी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन लिजंड्स स्पोर्ट्स क्लबचे संचालक संदीलदादा कोद्रे आणि सौरभ रवालिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हृषीकेश आगाशे,
प्रफुल्ल मानकर, रोहीत खारडे, स्पर्धेचे संचालक अमित गणपुळे आणि अभिराज वाधवाने आदि मान्यवर उपस्थित होते.
गटसाखळी फेरीः सामन्याचा संक्षिप्त निकाल :
ऑक्सिरीच स्मॅशर्सः २० षटकात १० गडी बाद ८२ धावा (तेजल हसबनीस १७, श्रद्धा पोखरकर १६, जाई देवन्नावर १३, सायली लोणकर ३-१५,
संजना वाघमोडे २-१२, आरती बाहेनवाल २-१२) पराभूत वि. न्युट्रीलिशियस् संघः १२.५ षटकात ३ गडी बाद ८३ धावा (गौतमी नाईक नाबाद ३०,
सायली लोणकर नाबाद २३, सोनल पाटील १३, श्रद्धा पोखरकर १-२२); सामनावीरः सायली लोणकर.
Web Title : 7th Punit Balan Group Women’s Premier League T-20 Cricket Tournament
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
- Amisha Patel Hugs Sanjay Raut | अमिषा पटेलनं दिली थेट संजय राऊतांना ‘जादू की झप्पी’..पाहा व्हायरल व्हिडिओ..!
- Ajit Pawar | अजित पवार यांचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन; म्हणाले – ‘हंगाम संपत असला तरी…’
- D Gang Terror Funding Case | मुंबईत NIA च्या धाडीत धक्कादायक माहिती समोर, दाऊदचा डाव उधळला ! आणखी 87 जण ‘रडार’ वर