बहुजननामा ऑनलाईन टीम : बुधवारी राजधानी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्र सरकारच्या ५० लाखाहून अधिक कर्मचार्यांच्या किमान वेतनात सरकार वाढ करण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने पूर्ण अहवाल तयार केला असून आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचार्यांचे किमान वेतन आठ हजारांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना किमान वेतन म्हणून १८,००० रुपये दिले जातात, जे या निर्णयानंतर वाढून २६,००० रुपये होतील. अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी त्यांच्या मूलभूत पगारामध्ये वाढ करण्याची मागणी करत होते.
गेल्या महिन्यातही केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्यांचे महागाई भत्ता (डीए) मध्ये पाच टक्क्यांनी वाढ केली होती. या निर्णयाचा फायदा एक कोटी सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना झाला. यापूर्वी कर्मचार्यांच्या डीएमध्ये २-३ टक्के वाढ करण्यात आली होती. परंतु यावेळी ते १२ टक्क्यांवरून १७ टक्के करण्यात आले.
Visit : bahujannama.com