नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लाखो केंद्रीय कर्मचारी पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्र सरकार ७ व्या वेतन आयोगांतर्गत वेतनवाढ जाहीर करेल, अशी अपेक्षा कर्मचार्यांना आहे, पण ही प्रतीक्षा अजून संपलेली नाही. ५० लाख केंद्रीय कर्मचारी पगार वाढीच्या प्रतीक्षेत असताना भारतीय टपाल खात्यातील कर्मचार्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टपाल खात्यातील कर्मचार्यांच्या प्रमोशनचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे.
या कर्मचार्यांना मिळणार प्रमोशन :
टपाल कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. सरकारने या कर्मचार्यांना मॉडीफाइड एर्श्योड कॅरियर प्रोग्रेशन स्कीम (MACPS) अंतर्गत प्रमोशनची तयारी केली आहे. या अधिकार्यांना प्रमोशन मिळायला हवे, असे स्पष्टीकरण जारी करून सरकारने अधिकृत घोषणा केली आहे. ही योजना ७व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत आणली गेली होती, ज्याच्या अंतर्गत अशा केंद्रीय कर्मचार्यांना वार्षिक मूल्यांकन किंवा वेतनवाढ मिळणार नाही, ज्यांची कामगिरी चांगली नाही, असा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय कर्मचार्यांना मोठा दिलासा :
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचार्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने हे स्पष्ट केले की, मोदी सरकार केंद्रीय कर्मचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय बदलणार नाही, असे अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत सांगितले. केंद्र सरकारने कर्मचार्यांना मोठा दिलासा दिला असून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. त्याचबरोबर, विद्यापीठांमधील डॉक्टर आणि प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे.
जानेवारीत या कर्मचार्यांच्या पगारामध्ये वाढ :
जानेवारी २०२० मध्ये केंद्रीय कर्मचार्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ अपेक्षित आहे. असे झाल्यास नवीन वर्षात कर्मचार्यांच्या पगारामध्ये वाढ होईल. ही वाढ ७२०ते १०,००० रुपयांपर्यंत असू शकते.
Visit : bahujannama.com