नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्र सरकार सणासुदीच्या काळात लाखो केंद्रीय कर्मचार्यांना आणि पेन्शनर्सला महागाई भत्त्याच्या वाढीची (Dearness Allowance) आणखी एक भेट देऊ शकते. केंद्र सरकारने 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्यांना आणि पेन्शनर्सला महागाई भत्त्यात (DA) 11 टक्के वाढ करून तो 17 ते 28 टक्के केला आहे. 1 जुलैपासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सला 28 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जुलैच्या पगारासोबत (7th Pay Commission) तो मिळाला आहे.
आता वृत्त आहे की सरकार लवकरच जूनचा महागाई भत्ता (DA) सुद्धा जारी करू शकते. पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये सरकार केंद्रीय कर्मचार्यांचा आणि पेन्शनर्सचा डीए 3 टक्के वाढवू शकते. अशावेळी लोकांचा महागाई भत्ता 28 टक्केने वाढून 31 टक्केवर पोहचेल. म्हणजे पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचार्यांच्या पगारात मोठी वाढ होईल.
CM सेक्रेटरी (स्टाफ साईड) शिव गोपाल मिश्रा यांचे म्हणणे आहे की, लवकरच सरकार याबाबत घोषणा करू शकते. AICPI चा जून 2021 मध्ये आकड़ा 121.7 वर पोहचला आहे. यामध्ये 1.1 अंकाची वाढ झाली आहे. अशाप्रकारे एकुण डीए 31.18 टक्के होतो. परंतु, डीएचे पेमेंट राऊंड फिगरमध्ये होते. यामुळे डिए 31 टक्के मिळेल. आता पुन्हा 3 टक्के वाढीनंतर महागाई भत्ता 31 टक्केच्या स्तरावर पोहचेल. म्हणजे केंद्रीय कर्मचार्यांच्या पगारात पुन्हा एकदा मोठी वाढ होईल.
31 टक्के महागाई भत्त्यावर कॅलक्युलेशन
– कर्मचार्याचा मूळ पगार – 18,000 रुपये
– नवीन महागाई भत्ता (31 टक्के)- 17,639 रुपये प्रति महिना
– आतापर्यंत महागाई भत्ता (17 टक्के)- 9,673 रुपये प्रति महिना
– किती महागाई भत्ता वाढला – 7966 रुपये प्रति महिना
– वार्षिक पगारात वाढ – 7966×12 = 95,592 रुपये
– 28 टक्के महागाई भत्त्यावर गणना
– कर्मचार्याचे मूळ वेतन – 18,000 रुपये
– नवीन महागाई भत्ता (टक्के) – 5,040 रुपये प्रति महिना
– आतापर्यंतचा महागाई भत्ता (17 टक्के)- 3,060 रुपये प्रति महिना
– किती वाढला महागाई भत्ता – 1980 रुपये वाढला
– वार्षिक वेतनात प्रति महिना – 1980×12 = 23760 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महागाई भत्त्याशिवाय (DA) हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) सुद्धा वाढला
केंद्र सरकारने डिए (DA) वाढल्यानंतर केंद्रीय कमर्चर्यांना मिळणारे हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) सुद्धा वाढवला आहे. सरकारने HRA ला वाढवून 27 टक्केपर्यंत केला आहे. महागाई भत्त्यानंतर आता हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) वाढल्याने केंद्रीय कर्मचार्यांना लाभ झाला आहे.
एचआरएमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी 1-3 टक्केची वाढ करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार, आता केंद्रीय कर्मचार्यांना त्यांच्या शहराच्या हिशेबाने 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के हाऊस रेंट अलाऊन्स मिळेल. सध्या तीन क्लाससाठी 24 टक्के, 16 टक्के आणि 8 टक्के आहे.
Web Title : 7th pay commission latest news updates central government employees da hike 31 percent salary calculation hike.
Rain in Maharashtra | महाराष्ट्रात पुन्हा पावसाची विश्रांती; जाणून घ्या कधी होणार वापसी