बहुजननामा ऑनलाईन टीम : केंद्रीय गृह मंत्रालयने नुकताच सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF) च्या सर्व जवानांना सरकार राशन मनी अलाउन्स ( RMA ) देण्याची घोषणा केली आहे. पोस्टिंग स्थानांतर्गत आणि कमांडेट स्तरापर्यंतच्या सैनिकांना हा RMA अलाउन्स मिळणार आहे. या संदर्भातील याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने १० एप्रिल रोजी पोस्टिंग स्थानांतर्गत आणि कमांडेट स्तरापर्यंतच्या CRPF जवानांना RAM देण्याचे निर्देश दिले होते.
कोर्टाने दिलेल्या सूचनेनुसार, सैनिकांना १२ आठवड्यांच्या कालावधीत RMA द्यावा. एवढेच नाही तर जर अलाउन्स ठरलेल्या वेळेत दिला गेला नाही, आणि त्यात उशीर झाल्यानंतर वार्षिक ६ टक्के व्याज देण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. दरम्यान सीआरपीएफ अधिकारी विक्रम सिंग यांनी ही सैनिकांना RMA अलाउन्स देण्याची याचिका कोर्टात सादर केली होती.
वास्तविक, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रालयालाकडून CRPF जवानांना RMA अलाउन्स देण्यासाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली होती. ज्याला आता सरकारतर्फे मंजुरी देण्यात आली आहे. या अलाउन्स अंतर्गत सैनिकांना त्यांच्या रोजच्या जेवणाचे पैसे देण्यात येणार आहेत, हि रक्कम त्यांच्या मासिक पगारासोबतच दिली जाणार आहे. सरकारद्वारा देण्यात येणाऱ्या या RMA अलाउन्समुळे जवळपास ३.२५ लाख सैनिकांना फायदा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान बिहार राज्य सरकारने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून पगारात ५ टक्के महागाई भत्ता वाढवण्याचे ठरवले आहे. २५ ऑक्टोबरपासून या पगारासंदर्भातील निर्देश लागू करण्यात येणार आहेत . त्यामुळे आता केंद्र सरकारने देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ५ टक्के महागाई भत्ता वाढवण्याचे ठरविले आहे.
visit : bahujannama.com