नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्यांसाठी खुशखबर आहे. Dearness Allowance वाढीच्या घोषणेनंतर आता केंद्र सरकारने हाऊस रेंट अलाऊंन्स (House Rent Allowance) वाढवून 27 टक्के केला आहे. महागाई भत्त्यानंतर आता HRA (House Rent Allowance) वाढल्याने केंद्रीय कर्मचार्यांचा डबल लाभ झाला आहे. 7th Pay Commission मुळं कर्मचार्यांना फायदा होत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
केंद्रीय कर्मचार्यांना डबल भेट
Dearness Allowance वाढीच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने हाऊस रेंट अलाऊन्स वाढवून 27 टक्केपर्यंत केला आहे. डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरने 7 जुलै 2017 ला एक आदेश जारी केला होता ज्यामध्ये म्हटले होते की, जेव्हा डियरनेस अलाऊन्स 25 टक्केच्या पुढे जाईल तेव्हा हाऊस रेंट अलाऊन्स रिव्हाईज केला जाईल. 1 जुलैपासून डियरनेस अलाऊन्स वाढून 28 टक्के झाला आहे ज्यामुळे हाऊस रेंट अलाऊन्स सुद्धा रिव्हाईज करण्यात आला आहे.
हाऊस रेंट अलाऊन्समध्ये रिव्हीजन
हाऊस रेंट अलाऊन्समध्ये रिव्हीजन नंतर वेगवेगळ्या कॅटगरीसाठी हाऊस रेंट अलाऊन्समध्ये 1-3 टक्केची वाढ केली आहे. ’X’ क्लास सिटीजसाठी HRA बेसिक पेच्या 27 टक्के असेल. त्याच प्रमाणे ’Y’ क्लास सिटीजसाठी 18 टक्के आणि ’Z’ क्लास सिटीजसाठी तो बेसिक पेच्या 9 टक्के असेल. सध्या तिनही क्लाससाठी 24 टक्के, 16 टक्के आणि 8 टकके आहे.
किती असतो ’हाऊस रेंट अलाऊन्स
ज्या शहराची लोकसंख्या 50 लाखापेक्षा जास्त असते ते ’X’ कॅटेगरीत येतात. तर ज्याची लोकसंख्या 5 लाखापेक्षी जास्त असते ते ’Y’ कॅटेगरीत येतात. आणि 5 लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहर ’Z’ कॅटेगरीत येते. तिनही कॅटगरीसाठी मिनिमम HRA 5400, 3600 आणि 1800 रुपये असेल. डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरनुसार, जेव्हा डियरनेस अलाऊन्स 50 टक्केवर जाईल तेव्हा मॅक्सिमम House Rent Allowance वाढून 30 टक्के होईल.
Web Titel :- 7th pay commission latest news after da centre hikes house rent allowance know
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Labour Code News | सरकारी कर्मचार्यांसाठी खुशखबर ! वाढलेल्या DA सोबत मिळू शकतात 300 सुट्ट्या !