नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | कोरोना संकटादरम्यान मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यावर लावलेला प्रतिबंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटने केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता म्हणजे डीए (Dearness Allowance) 17 टक्केवरून वाढवून 28 टक्के केला आहे. अशाच प्रकारे डीएमध्ये एकुण 11 टक्केची वाढ झाली आहे. पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.(7th Pay Commission)
प्रेस कॉन्फरन्स(Press conference)मध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर(Union Minister Anurag Thakur) यांनी कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एकुण बजेट 34 हजार कोटी रुपयांपर्यंत राहील. हा निर्णय 1 जुलैपासून लागू होईल.
इतका येईल डीए (Dearness Allowance)
सॅलरी किती वाढणार हे पाहण्यासाठी बेसिक सॅलरी चेक केली पाहिजे. सोबतच यानंतर आपला
सध्याचा डीए तपासा. सध्या तो 17 टक्के आहे जो आता 28 टक्के झाला आहे. यासाठी मासिक
डीए 11 टक्के वाढेल. यासाठी, केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचार्याचा डीए 1 जुलै 2021 पासून त्यांच्या मुळ वेतनाच्या 11 टक्केपर्यंत वाढेल. डीआरच्या गणनेवर सुद्धा हा फार्म्युला लागू होईल.