नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | सरकारी कर्मचार्यांना (Central Government Employees) लवकरच चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. सरकार लवकरच फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) वाढवण्यासाठी मंजूरी देऊ शकते. सरकारने Dearness Allowance (DA) 31 टक्केवरून वाढवून 34 टक्के केला आहे. यानंतर किमान बेसिक पे (Basic Pay) वाढवण्याची अपेक्षा जास्त वाढल्या आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचारी यूनियन दिर्घ कालावधीपासून फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वाढवून 3.68 पट करण्याची मागणी करत आहेत, असे झाल्यास किमान बेसिक पगार 18000 रूपयांवरून वाढून 26000 रूपये होईल. सरकारने यापूर्वी 2017 मध्ये एंट्री लेव्हल बेसिक पे 7000 रूपये प्रति महिन्यावरून वाढवून 18000 रुपये केला होता. (7th Pay Commission)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वाढणार फिटमेंट फॅक्टर
जर सरकारने केंद्रीय कर्मचार्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची घोषणा केली तर त्यांच्या पगारात वाढ होईल. सध्या कर्मचार्यांना 2.57 टक्केच्या आधारावर फिटमेंट फॅक्टर अंतर्गत पगार मिळत आहे, जो वाढवून 3.68 टक्के केला तर, कर्मचार्यांच्या किमान पगारात 8000 रुपये वाढतील. याचा अर्थ, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांचे मूळ वेतन 18000 रुपयांवरून वाढून 26000 रुपये होईल. (7th Pay Commission)
इतका होईल पगार
जर फिटमेंट फॅक्टर वाढवून 3.68 टक्के केला तर, कर्मचार्यांचे मूळ वेतन 26000 रूपये होईल. आता जर तुमचे किमान वेतन 18000 रूपये असेल तर भत्ते सोडून तुम्हाला 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार 46,260 रुपये (18000 द 2.57 = 46,260) मिळतील. आता जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर पगार 95,680 (26000 द 3.68 = 95,680) होईल.
अगोदर इतकी होती बेसिक सॅलरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने जून 2017 मध्ये 34 सुधारणांसह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींना मंजूरी दिली होती. एंट्री लेव्हल बेसिक पे 7000 रूपये दरमहावरून वाढवून 18000 रूपये करण्यात आला, तर उच्च स्तर म्हणजे सचिवांना 90,000 रूपयांवरून वाढवून 2.5 लाख रुपये करण्यात आला. क्लास 1 अधिकार्यांसाठी प्रारंभिक वेतन 56,100 रूपये होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission update on fitment factor will increase salary to rs 26000 pm narendra modi government
हे देखील वाचा :
WhatsApp New Features | आता व्हॉट्सअॅपवर कॅप्शनसहीत फोटो फॉरवर्ड करता येणार; जाणून घ्या सोपी पद्धत
Raosaheb Danve | ‘भाजप वेगळा डाव टाकणार, अन्…’ – रावसाहेब दानवे