नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्र सरकार आपल्या लाखो कर्मचार्यांना (Central Government Employee) ऑगस्ट महिन्यात तीन प्रकारची भेट देऊ शकते. कर्मचारी पगारवाढीची (Salary Hike) दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत आहेत. आता बातमी अशी आहे की, पुढील महिन्यात कर्मचार्यांचे पगार वाढवण्यापासून ते थकबाकी भरण्यापर्यंतच्या योजनेवर सरकार काम करत आहे. डीए वाढीसह (DA Hike) पुढील महिन्यात थकीत डीए (Due DA) चे पेमेंटही केले जाऊ शकते. यासोबतच पीएफवर मिळणारे व्याजही सरकार कर्मचार्यांच्या खात्यात टाकू शकते. (7th Pay Commission)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
1. थकीत डीए भरणे
वृत्तानुसार, सरकार केंद्रीय कर्मचार्यांचा थकीत डीए पुढील महिन्यात देऊ शकते. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. सरकारी कर्मचार्यांकडे जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत एकूण 18 महिन्यांची डीए थकबाकी आहे. बातमीनुसार, केंद्रीय कर्मचार्यांना एकावेळी दीड ते दोन लाख रुपयांचा थकीत डीए मिळू शकतो. कर्मचार्यांकडून थकित डीएची मागणी सातत्याने केली जात आहे. (7th Pay Commission)
2. वाढू शकतो डीए
गेल्या महिन्यापासून सरकार केंद्रीय कर्मचार्यांच्या डीएमध्ये वाढ करू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वाढती महागाई पाहता आता सरकार कर्मचार्यांच्या डीएमध्ये किमान 4 ते 5 टक्के वाढ करणार असल्याचे बोलले जात आहे.
जून महिन्यातही किरकोळ महागाईचा दर 7 टक्क्यांच्या वर होता, जो रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे.
त्यामुळे सरकार कर्मचार्यांच्या डीएमध्ये वाढ करू शकते, अशी अपेक्षा आहे.
सध्या कर्मचार्यांना 34 टक्के दराने डीए मिळत आहे. सरकारने यावर्षी मार्चमध्ये डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली होती. सतत वाढत चाललेल्या महागाईच्या काळात सरकार कर्मचार्यांना खुशखबर देऊ शकते. सरकारने डीए वाढवल्यास 50 लाखांहून जास्त कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
3. मिळू शकते पीएफचे व्याज
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) जमा केलेल्या रकमेवर सरकारने व्याजदराचा शिक्का मारला आहे.
2021-22 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफवर 8.01 व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात PF वर 8.5 टक्के व्याज मिळत होते.
सरकार जुलैमध्ये पीएफच्या व्याजाचे पैसे कर्मचार्यांच्या खात्यात टाकू शकेल अशी अपेक्षा आहे.
पगारदार लोकांच्या मूळ पगाराच्या 12% रक्कम EPF मध्ये जमा केली जाते.
तुम्ही तुमची जमा रक्कम उमंग अॅप (Umang APP), ईपीएफओ सदस्य ई-सेवा पोर्टल (EPFO Portal), एसएमएस SMS किंवा मिस्ड कॉलद्वारे तपासू शकता.
Web Title : – 7th Pay Commission | 7th pay commission big announcement in august da hike due da arrears and pf interest rate
हे देखील वाचा :
Heart Attack | ‘या’ एका टेस्टने लागू शकतो हृदयाच्या आजाराचा शोध, वाचू शकतो रूग्णाचा प्राण