बीड : बहुजननामा ऑनलाईन – अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत एका वीटभट्टी चालकाला 15 लाख रुपयांची खंडणी मगितल्याचा प्रकार आष्टी (जि. बीड) येथे घडला. पोलिसांनी महिलेसह सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. कैलास गुजर, प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील केज येथील वीटभट्टी चालकाचे बांधकामासाठी विटाची मागणी करणार्या एका महिलेशी त्यांचे मोबाईलवर बोलणे झाले. महिलेने त्यांना मांजरसुंबा येथे येण्यास सांगून नंतर त्याच्याच गाडीतून आधी पाटोदा व पुन्हा आष्टी येथे सोडण्यास सांगितले. आष्टी येथे गेल्यानंतर महिलेने वीटभट्टी चालकास चहासाठी घरात बोलावून अश्लिल छायाचित्र काढून घेतले. त्यानंतर व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची मागणी केली.