नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी मंगळवारी दिल्लीत झालेल्या हिंसेसंबंधी याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या ६ न्यायाधीशांना स्वाइन फ्लू झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे अनेक प्रकरणांची सुनावणी होऊ शकत नाहीये. न्या. चंद्रचूड यांनी वकिलांना आणि कोर्टाच्या स्टाफला खबरदारी घेण्याचा सल्ला दिला असून त्यांनी न्यायाधीश H1N1 चा शिकार असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी मंगळवारी कोर्टात मास्क घालून काम केले.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी या संपूर्ण प्रकरणावर मुख्य न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्याशी बोलले आहेत. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात काम करणार्या व्यक्तींना लसीकरणाच्या सूचना देण्यात याव्या. या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सीजेआयने सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांची भेट घेतली असून यानंतर सीजेआयने लसीकरणासाठी दवाखाना उघडला जाईल, असे सीजेआयने सांगितले.
या फ्लूमध्ये सुरुवातीला ताप येणे, सर्दी होणे, भूक न लागणे, थकवा जाणवणे, गळ्यात खवखवणे, खोकला, उलटी आणि चक्कर येणे अशी लक्षणे दिसून येतात. या फ्लूची लक्षणे साधारण ताप – खोकल्याच्या व्हायरससारखा असून काही उपाय आणि प्रयत्नांनंतर याचा प्रसार थांबवू शकतो. या व्हायरसचा शिकार सर्वात पहिले लहान मुले, वृद्ध आणि ज्यांचे उपचार चालू आहेत ते असतात. त्यांनाच यापासून जास्त सावधान राहिले पाहिजे.