बहुजननामा ऑनलाइन टीम – सोशल मीडिया प्लॅटफार्म सध्या मनोरंजनाचे स्वस्त साधन बनले आहे, परंतु मनोरंजासह लोक सोशल मीडियावर फनी व्हिडिओ(6 year old Pandey) सुद्धा शेयर करू लागले आहेत. काही व्हिडिओ असे असतात, जे आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात तर काही हसायला लावतात. रोज असे व्हिडिओ वायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी एका मुलाचा व्हिडिओ वायरल झाला होता, ज्यामध्ये एक मुलगा केस कापणार्यावर ओरडत होता. आता एक असा व्हिडिओ वायरल झाला आहे ज्यामध्ये सहा वर्षांचा मुलगा आईला आपल्या लग्नाबाबत सांगत आहे.
माजी नौदल अधिकारी हरिंदर सिहं सिक्का यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यास त्यांनी कॅपशन दिले आहे, तरूण पांडेजी सहा वर्षांचे आहेत. ते स्मार्ट, हँडसम, गुड लुकिंग, बुद्धिमान आहेत आणि निश्चितपणे पप्पू नाहीत. स्मार्ट फोन त्याचे खेळणे आहे. त्याचे तर्क तर्कावर अधारित आहेत. ते उपयुक्त मॅचिंगच्या शोधात आहेत.
सहा वर्षांचा हा मुलगा आपल्या आईला सांगत आहे की, त्याचे लग्न लावून द्यावे, ज्यामुळे त्याला एक पार्टनर मिळेल, जी आईला कामात मदत करेल. तसेच त्याच्यासोबत गेम खेळेल. हा मुलगा म्हणतो, आता आपले तीन लोकांचे कुटुंब आहे, लग्नानंतर चार लोकांचे होईल. मग लपाछपी खेळेन. या मुलाचे हे सर्व बोलणे आईने फोनमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेयर केले आहे. मुलाच्या निष्पाप मनावर आईदेखील हसताना दिसत आहे आणि सतत प्रश्न विचारून मुलाच्या मनातीला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.