पुणे : बहुजननामा ऑनालाइन – पुणे जिल्ह्यात रात्रीत एकूण ५२ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गेल्या २४ तासात पुणे जिल्ह्यात तब्बल २११ नवीन रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४ हजार २२९ झाली आहे.
गेल्या २४ तासात ५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २११ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात १५९ नवीन रुग्ण आढळून आले होते. त्यात रात्रीत आणखी ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ५५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत २ हजार ६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
पुणे, पिंपरी चिंचवडबरोबर आता जिल्ह्याचा अनेक ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. सध्या जिल्ह्यात १ हजार ९४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी १६६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत.