बहुजननामा ऑनलाईन टीम : कर्नाटक पोलिसांनी बहुचर्चित IMA घोटाळ्यामध्ये ५ पोलिस अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात दोन IPS अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
हेमंत निंबाळकर, अजय हिलोरी व अन्य ३ अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. IMA घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मन्सूर खानला मदत केल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे.
या घोटाळ्याप्रकरणी कर्नाटक पोलिस अधिकाऱ्यांवर नवीन गुन्हे दाखल झाले आहेत. राज्य सरकारने आरोपींविरोधात कारवाईचे आदेश दिले असून त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वृत्त एका राष्ट्रीय चॅनेलने दिले आहे.