बहुजननामा ऑनलाईन टीम : भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांचा टाईम मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 उगवत्या नेतृत्वाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 34 वर्षीय चंद्रशेखर आझाद हे दलितांना गरीबीतून बाहेर येण्यासाठी शाळा चालवतात. तसेच दलितांवरील अन्यायाविरुद्ध बुलंद आवाज उठवण्यातही ते अग्रेसर असतात. ते जातीय भेदभावावर चिथावणीखोर आंदोलन करतात, असेही टाईम प्रोफाईलमध्ये नमूद केले आहे. आझाद यांच्यासह भारतीय वंशाच्या 5 व्यक्तीचा या यादीत समावेश केला आहे.
यात ट्विटरच्या सर्वोच्च वकील विजया गाडे आणि ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सनक यांचाही समवावेश आहे. टाईम मासिकाने 2021 च्या 100 नेक्स्टची यादी नुकतीच प्रसिद्ध केली. टाईमच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या याद्यांमध्ये ही श्रेणी नव्याने समाविष्ट केली आहे.
नव्या यादीत भविष्यात इतिहास घडवण्याची क्षमता असणाऱ्या जगभरातली उद्योन्मुख नेतृत्वांचा सामावेश केला आहे. टाईम 100 चे एडिटोरियल डायरेक्टर डेन मॅक्सै म्हणाले की, या यादीत समविष्ट सर्व व्यक्ती भविष्यात इतिहास घडवण्याची ताकद ठेवतात. काही तर आताच इतिहास घडवत आहेत.