बेंगळुरु : वृत्त संस्था – एका तरुणीवर बलात्कार (Rape) करणे, तिचा छळ करणे आणि मारहाणीची रेकॉर्डिंग करण्याच्या आरोपात पाच लोकांना अटक करण्यात आली आहे. बेंगळुरु पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी याबाबत माहिती देताना म्हटले की, आरोपींना पकडण्यासाठी आसाम पोलिसांनी वायरल होत असलेल्या व्हिडिओपैकी काही छायाचित्र वायरल केली होती. छायाचित्र शेयर केल्यानंतर काही तासांच्या आत आरोपींना पकडण्यात आले. मागील दोन-तीन दिवसांपासून लैंगिक छळाचे हे प्रकरण सोशल मीडियावर गाजत आहे.
केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी सुद्धा या प्रकरणात राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांची मदत मागितली होती. माहितीनुसार, ज्या पाच लोकांना अटक केली आहे, त्यामध्ये एका महिलेचा सुद्धा समावेश आहे. बेंगळुरु पोलिसांनी एका वक्तव्यात म्हटले आहे की, एका व्हिडिओ क्लिपच्या आधारावर, ज्यामध्ये एका महिलेसह पाच लोक शारीरीक शोषण करताना दिसत आहेत, त्यांचा ताबडतोब शोध घेण्यात आला आणि अटक करण्यात आली.
प्रकरणाच्या तपासात समजले की, पीडिता आणि आरोपी बांगलादेशी होते. सर्व एकाच ग्रुपचे होते परंतु नंतर त्यांच्यात पैशावरून वाद झाला ज्यानंतर आरोपींनी महिलेचे शारीरीक शोषण केले. पीडितेला मानवी तस्करीसाठी भारतात आणले होते.
राममूर्ती नगरच्या पोलिसांनी एका वक्तव्यात म्हटले की, व्हिडिओ जवळपास 10 दिवसांपूर्वीचा आहे आणि पाच लोक, ज्यांना बांगलादेशी समजले जात आहे, एका अंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटमध्ये सहभागी होते.
जयपुरमधून समोर आली होती घटना
यापूर्वी जयपुरमधून सुद्धा धक्कादायक प्रकरण समोर आले होते, ज्यामध्ये तरूणांनी भीक मागून खाणार्या एका महिलेवर अॅम्ब्युलन्समध्ये बलात्कार केला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.