• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

खासदारांसाठी दिल्लीत तब्बल 213 कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आले 4 BHK फ्लॅट्स, पंतप्रधान मोदींनी केलं उद्घाटन

by sheetal
November 23, 2020
in राजकीय
0
Modi government

Modi government

 बहुजननामा ऑनलाइन टीम –   “अनेक इमारतींचे बांधकाम आमच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये सुरु झालं आणि नियोजित वेळेआधी पूर्ण झालं. अटलजींच्या काळात ज्या आंबेडकर नॅशनल मेमोरियलची चर्चा सुरु झाली होती त्याचे बांधकामही याच सरकारच्या कालावधीमध्ये करण्यात आलं. आमच्या सरकारने अनेक वर्षांपासून अडकून पडलेल्या अनेक योजना मार्गी लावल्या,” खासदारांसाठी उभारण्यात आलेल्या निवासस्थानांचे उदघाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी(inaugurated by Prime Minister Modi) बोलत होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा उद्घाटन सोहळा पार पडला.

ही सर्व बहुमजली घरं दिल्लीतील डॉक्टर बीडी मार्गावर आहेत. खासदारांना देण्यात आलेली घरं ही फोर बीएचके कॉन्फिगरेशनची आहेत. खासदारांना घरांबरोबरच त्यांच्या कार्यालयासाठी वेगली जागा देण्यात आली आहे. या प्रत्येक घरामध्ये दोन बाल्कनी, चार वॉशरुम आणि एक देवघर देण्यात आलं आहे. यामध्ये मॉड्युलर किचनही देण्यात आलं आहे. तसेच स्टाफसाठी वेगळे स्टाफ कॉर्टर्सही उभारण्यात आलेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले…

खासदारांना लोकप्रितनिधी म्हणून काम करताना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या नवीन घरांमध्ये देण्यात आल्या आहेत. दिल्लीमध्ये खासदारांना राहण्यासाठी निवाऱ्याची सोय हा मागील बऱ्याच काळापासून चर्चेचा मुद्दा होता. अनेकदा खासदारांना दिल्लीत गेल्यावर हॉटेलमध्ये रहावे लागते ज्यामुळे त्यांचा खर्च वाढतो. अशा दशकांपासूनच्या समस्या टाळल्याने नाही तर सोडवल्याने सुटतात. अनेक दशकांपासून असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचे निराकरण होत नाही तर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केल्यानं होतं. देशामध्ये वॉर मेमोरियल, पोलीस मेमोरियलसारख्या अनेक योजना होत्या ज्या मागील अनेक वर्षांपासून अडकून पडलेल्या होत्या. आमच्या सरकारने या सर्व योजना पूर्ण केल्या.

मोदींनी या योजनेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. “आपल्याकडे क्रिया सिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे असं म्हणतात. म्हणजेच कर्माची सिद्धी आपल्या सत्यावर संकल्पावर आणि नियतीवर अवलंबून असते. आपल्याकडे साधन आहे आणि दृढ संकल्पही आहे,” असं मोदींनी म्हणले. सरकारने दिलेल्या माहितीनुसार बीडी मार्गावर गंगा, यमुना आणि सरस्वती नावाने तीन मोठे टॉवर बांधण्यात आले आहेत. यामध्ये एकूण ७६ फ्लॅट आहेत. या इमारतींच्या बांधकामासाठी ८० वर्ष जुने आठ बंगले पाडण्यात आले. या बंगल्यांच्या जागीच हे टॉवर उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी एकूण २१३ कोटींचा खर्च आहे. करोनाच्या साथीनंतरही एकूण अपेक्षित खर्चापेक्षा १४ टक्के कमी खर्चात हा प्रकल्प उभारण्यात आला. लोकसभेचे स्पीकर असणारे ओम बिर्ला हे संसदेमध्ये सदनाचा वेळ वाचवण्यासाठी ज्याप्रमाणे प्रयत्नशील असतात तशाच प्रकारे त्यांनी ही घरं उभारताना पैशांची बचत केली. ही घरं उभारताना पर्यावरणाची काळजी घेण्यात आली आहे.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

Video : ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबातीचा धक्कादायक खुलासा ! म्हणाला ‘…तेव्हा जीव जायची वेळ आली होती’

Next Post

जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर !

Next Post
Gold Rate Today

जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर !

People
विशेष बातम्या

‘लाल’ रंग आवडणाऱ्या व्यक्तींमध्ये असते ‘ही’ विशेष गोष्ट, प्रेमाच्या बाबतीतही असतात इतरांपेक्षा वेगळे !

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -  मोजता येणार नाहीत इतके नानाविध रंग जगात आहेत पण आपल्याला या अनेक रंगांपैकी कुठलातरी एक खास...

Read more
Buldhana

बुलढाणा : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक

January 28, 2021
The body

शेवगावात नदीपात्रामध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, प्रचंड खळबळ

January 28, 2021
Australia

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

‘लाल’ रंग आवडणाऱ्या व्यक्तींमध्ये असते ‘ही’ विशेष गोष्ट, प्रेमाच्या बाबतीतही असतात इतरांपेक्षा वेगळे !

5 mins ago

लग्नानंतर इतर हिरोईन्ससोबत काम नाही करणार वरुण धवन ? अभिनेत्रीच्या कमेंटची जोरदार ‘चर्चा’

2 days ago

नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना वाहनाची किंमत आणि विमा प्रीमियम वेगवेगळे भरण्याचा मिळू शकतो पर्याय

3 days ago

…म्हणूनच धनंजय मुंडे प्रकरणात खोलात जाण्याची गरज असल्याचा निष्कर्ष काढला

6 days ago

बच्चन कुटुंबातील कुणालाच ‘वरुण-नताशा’च्या लग्नाचं आमंत्रण नाही ? कपूर फॅमिलीसुद्ध गेस्ट लिस्टमधून गायब !

5 days ago

… तर भाजपने तांडव केल असतं, अर्णब गोस्वामी प्रकरणावरून खासदार राऊतांचा निशाणा

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat