नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील बुलढाणा जिल्हयातील 71 वर्षीय कोरोना संशयिताचा शनिवारी दुपारी 4 वाजून 20 मिनीटांनी मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या वृध्दाचा कोरोनामुळेच मृत्यू झाला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
Suspected coronavirus patient who died at Buldhana hospital in Maharashtra was suffering from diabetes and hypertension, according to doctors
— Press Trust of India (@PTI_News) March 14, 2020
सुरवातीच्या काही दिवस मयत झालेल्या वृध्दास उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो त्रास वाढल्यामुळं त्यांना आज बुलढाणा येथील जनरल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान, दुपारी 4 वाजून 20 मिनीटांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
मयत झालेल्या वृध्दास कोरोनाची लक्षणं होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यांचा मृत्यू कोरोनामुळेच झाला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयत झालेल्या वृध्दास शुगरचा देखील त्रास होता.