बहुजननामा ऑनलाईन – हेरॉइनने भरलेल्या ३७० कॅप्सूलची वाहतुक कऱणाऱ्या पाच अफगाणिस्तानी नागरिकांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. धक्कादायक बाब अशी की त्यांनी हे कॅप्सुल पोटातून आणले होते. या कॅप्सुलची किमंत तब्बल १५ कोटी असल्याची माहिती पोलीसांनी दिली. दिल्लीत लोकांना हेरॉइन पुरवण्याच्या योजनेने त्यांनी हे कॅप्सुल आणले होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल आणि कस्टम विभागाला गुप्तचर यंत्रणा रॉ कडून १४ सप्टेंबर रोजी माहिती मिळाली की, संशयास्पद हलाचाली असणारे पाच अफगाणिस्तानी नागरिक दिल्ली विमानतळावर पोहचणार आहे. या माहितीच्या आधारे दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी विमानतळावर लक्ष ठेवत पाच अफगाणिस्तानी नागरिकांना ताब्यात घेतले. कॅप्सुल त्यांनी गिळंकृत केले असल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला. त्यांनी दिलेली माहितीची सत्यता पडताळण्यासाठी पोलीसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले.
क्ष-किरण तपासणी अहवालात त्यांच्या पोटात कॅप्सुल आढळून आल्याने सर्व अधिकारी आश्चर्यचकित झाले. डॉक्टरांनी ऑपरेशनद्वारे पाच दिवसांत त्यांच्या पोटातून ३७० काढले. सर्व कॅप्सूल हेरॉइनने भरलेले होते. बाजारात त्याची किंमत १५ कोटी आहे. सध्या प्रत्येकाच्या शरीरातून कॅप्सूल काढले गेले आहेत. या औषधांचा पुरवठा दिल्लीत करण्यात येणार असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. सद्यस्थितीत सर्व आरोपी विशेष सेलच्या ताब्यात आहेत, त्यांचा दहशतवादाशी संपर्क आहे का याचीही चौकशी सुरू आहे.
Visit : bahujannama.com