36 वर्षीय सिंगरनं 71 वर्षाच्या प्रोड्यूसरशी केले लग्न, लवकरच देणार जुळ्या मुलांना जन्म

December 18, 2020

बहुजननामा ऑनलाईन टीम : हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका कॅथरीन मॅकफीनं आपल्या चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिल आहे. कॅथरिन ही ३६ वर्षाची असून जून २०१९ मध्ये तिने ७१ वर्षीय डेव्हिड फॉस्टरशी लग्न केले होते. डेव्हिड फॉस्टर हे व्यवसायाने प्रसिद्ध निर्माता आहेत. कॅथरीन मॅकफी प्रेग्नंट असून लवकरच जुळ्या बाळांना जन्म देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं एक कपल अखेर गुड न्युज देत सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कॅथरीनच्या प्रेग्नंसीच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासूनच चर्चेत होत्या.

डेव्हिड फॉस्टर हे व्यवसायाने प्रसिद्ध निर्माता आहेत. कॅथरीन ही डेव्हिडची पाचवी पत्नी आहे. या दोघांमध्ये असलेल्या वयाच्या अंतरामुळेच या कपलची सर्वाधिक चर्चा रंगली होती. डिसेंबरमध्ये अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. फोस्टरने कॅथरिनसह लग्नाआधी चार वेळा लग्न केले होते. चारही लग्न फार काळ काही टिकली नाहीत. तर कॅथरिनचेही डेविडसह दुसरे लग्न आहे. तुर्तास दोघेही एकमेकांना वेळ देत बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. तिचे हे पहिले बाळ आहे तर तिचा पती डेविड फोस्टरचे हे सहावे मुल असणार आहे. त्यानुसार सहाव्यांदा डेविड वयाच्या ७१ व्या वर्षी वडील होणार आहे. डेविडही कॅथरिनला पुरेपुर वेळ देत आहे. तिची तो काळजी घेत आहे.

इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे ती प्रेग्नेंट असल्याचे सा-यांनाच कळलं होतं. नुकतेच बेबी बंम्प फ्लाँट करतानाचं फोटो तिनं शेअर केले होते. तिचे हे फोटो पाहून सा-यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कॅथरीन प्रेग्नंट असल्याचे कळाल्यापासून ती खूप एक्सायटेड दिसते. आनंद गगनात मावेनासा झाला आहे. जीवनात जुळ्या बाळाचं आगमन होणार असल्याचे समजल्यापासून दोघेही खूप खुश आहे.